*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2025 | सोमवार* 

1. मुंबई-पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची बॅटिंग, खडकवासला धरणातून पाणी सोडलं, धायरी अन् इंदापूरमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं, पुण्यातील शाळांना सुट्टी https://tinyurl.com/2am4bvry   विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा हाहा:कार; तेरणा नदीला पूर, तुळजापूर–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद, पीकांचं मोठं नुकसान  https://tinyurl.com/mpvsnttp  करमाळ्यात कोर्टीत   धो-धो पाऊस, ढगफुटीसदृश परिस्थिती, उजनीतून एक लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग https://tinyurl.com/5n6du72p  बीडमध्ये पावसाचा धुमाकूळ! सरस्वती, लेंडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, अनेक गावांचा संपर्क तुटला https://tinyurl.com/3595hc9u 

2. कांद्याला किंमत नाही, शेतकऱ्यांचा संसार अडचणीत; देवाभाऊ, शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि बळीराजाकडे ढुंकून पाहात नाहीत, नाशिकमधील शेतकरी मोर्चातून शरद पवारांचा हल्लाबोल https://tinyurl.com/y8kkha3r  'देवाभाऊ'च्या सरकारने पुढच्या एका महिन्यात कर्जमाफी केली नाही तर सरकारला राज्यात फिरू देणार नाही, खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला गंभीर इशारा  https://tinyurl.com/3erc3mv7  डोक्यावर गांधी टोपी, गळ्यात कांदा, बटाटा, वांग्याचा हार; शरद पवारांसमोर कराळे मास्तरांचं भाषण जोरदार https://tinyurl.com/y7j5ua6b 

3. बीडमध्ये बंजारा समाजाचा विराट मोठा मोर्चा, आंदोलक रस्त्यावर; ST प्रवर्गातील मागणीला खासदारांसह 6 आमदारांचा पाठिंबा https://tinyurl.com/emdv5mkd  बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही; बीडमधून धनंजय मुंडे यांची मागणी https://tinyurl.com/383hr67b  धाराशिवच्या 8 गावांमध्ये कुणबी प्रमाणपत्रासाठी ताटकळावे लागणार, नोंदी शोधण्यासाठी सातारा गॅझेट लागण्याची शक्यता https://tinyurl.com/3432ddfk 

4. पाकिस्तान जिंकला किंवा पराभूत झाला, याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही, अशा सामन्यावर आम्ही थुंकतो, खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल https://tinyurl.com/yhtw7349   भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यावर काल दीड लाख कोटी रुपयांचा जुगार खेळण्यात आला, 1000 कोटी रुपये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले; संजय राऊतांचा दावा  https://tinyurl.com/yhtw7349   थुंकण्याची भाषा करुन आपल्या क्रिकेटपटूंचा अपमान करत असाल, तर देश तुमच्यावर थुंकेल; भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचं संजय राऊत यांचं प्रत्युत्तर  https://youtu.be/799JDYXJ81Y?si=FMOYg_7zbiZod-Zg 

5. नितेश राणे विरुद्ध उदय सामंतामध्ये कलगीतुरा सुरुच; रंगीबेरंगी मफलर विरुद्ध भगवे मफलर वापरण्यावरून टोलेबाजी https://tinyurl.com/4bfny543  जत पंचायत समितीतील कनिष्ठ अभियंत्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करा; आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी https://tinyurl.com/2k654rhk 

6. नवी मुंबईतील ट्रक हेल्परच्या अपहरण प्रकरणात बोगस IAS पूजा खेडकरचे वडील सहभागी, पोलिसांना माहिती मिळताच फरार,  तपासासाठी बंगल्यात पोहोचताच मनोरमा खेडकरने पोलिसांवर कुत्रे सोडले https://tinyurl.com/3znhk8e5   अपहरण प्रकरणात सहभाग असल्याचं समोर येताच पूजा खेडकरचे आई-वडील फरार, पण तिकडं पुण्यातील बंगल्यावर जेवणाचे डबे पोहोचले https://tinyurl.com/yc4cz5r3  पोलिसांवर कुत्रे सोडून आरोपीला पळवून लावले, पूजा खेडकरच्या आईवर गंभीर आरोप, चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  https://tinyurl.com/2t25pe3p 

7. नियमांचे पालन करुन कुणी हत्तीची काळजी घेत असेल तर चुकीचं काय? वनतारा प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण  https://tinyurl.com/5yd4ednv   मानवी हक्कांचे उल्लंघन रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश  https://tinyurl.com/3hfdy65x 

8. मकरंद तू आता नाम फाउंडेशनच्या कामात लक्ष दे, मला आता निवृत्ती हवी आहे, मी नाटक-सिनेमातूनही 99 टक्के निवृत्ती घेतोय, अभिनेते नाना पाटेकर यांची घोषणा  https://tinyurl.com/2n9fu74k   दशावतार सिनेमाचा धमाका, 5 कोटी 22 लाखांची छप्परफाड कमाई; वीकेंडला शो हाऊसफुल्ल https://tinyurl.com/mwxf5f9v 

9. कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या वृद्ध शेतकरी दाम्पत्याचं टोकाचं पाऊल, पतीचा मृत्य, तर पत्नीची मृत्यूशी झुंज सुरु, नागपूर नरखेड तालुक्यातील घटना https://tinyurl.com/bdcsc88d   सांगलीत 'स्पेशल 26' फिल्मी स्टाईलने घरात एन्ट्री अन् आयकर अधिकारी असल्याचे सांगत कोट्यावधी रुपयांची रोकड आणि सोनं लुटलं https://tinyurl.com/aa2fymye  परभणीत भरधाव ट्रक थेट झाडावर आदळला, पुढील भागाचा चेंदामेंदा; भीषण अपघातात चालक अन् क्लिनर दोघेही ठार https://tinyurl.com/ba7cjx6t  अनैतिक संबंधाचा संशय, अडथळा ठरणाऱ्या प्रेयसीच्या नवऱ्याचा प्रियकरानं काटा काढला, नाशिकमधील घटना  https://tinyurl.com/4wy2et2b     

10.  हा क्रिकेट सामना होता, त्याला राजकीय रंग देऊ नका, आम्ही तुमच्यासाठी चांगल्या गोष्टींबद्दल बोलत आहोत, हस्तांदोलन करा, हा क्रिकेटचा खेळ आहे; भारत-पाक सामन्यानंतरच्या घडामोडींवर शोएब अख्तरची प्रतिक्रिया  https://tinyurl.com/237c6zms  हा विजय शूरवीर भारतीय सैन्याला समर्पित, पाकची धूळदाण उडवल्यानंतर सूर्यकुमार यादवने मनं जिंकली, पहलगाम हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली  ttps://tinyurl.com/3wd34bsj   RCB ला IPL जेतेपद मिळवून देणाऱ्या रजत पाटीदारचा आणखी एक धमाका, मानाच्या दुलीप ट्रॉफीवर सेंट्रल झोन संघाने नाव कोरलं, साऊथ झोनवर 6 विकेट्सनी मात https://tinyurl.com/3268xzce 

*एबीपी माझा स्पेशल* ब्लॉग :'भव्य' तर बनलो, पण 'दिव्य' बनाक नाय; एबीपी माझाचे विजय साळवी यांचा विशेष ब्लॉग https://tinyurl.com/mubfsyhm

*एबीपी माझा Whatsapp Channel*- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w