ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2025 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2025 | सोमवार
1.राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, धाराशिव, शिरुर, इगतपुरी, भोकरदन, जुन्नरसह 34 नगरपरिषदा OBC महिलांसाठी राखीव https://tinyurl.com/5fubwjbz बीड, मोहोळ, ओझर, शिर्डीसह 16 नगरपरिषदा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव https://tinyurl.com/48uk655t
2. परळी, पंढरपूर, कागल, कळमनुरीसह राज्यातील 68 नगरपरिषदा खुला महिला प्रवर्गासाठी राखीव https://tinyurl.com/5a29p6bs राज्यातील 38 नगरपंचायतींचे नगराध्यक्षपद ओबीसींसाठी राखीव https://tinyurl.com/yvyknfef
3. बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान, तर 14 नोव्हेंबर रोजी निकाल, 7.42 कोटी मतदार बिहारचा फैसला करणार https://tinyurl.com/3nazsn3a मतदारयादीचं शुद्धीकरण केलं, बिहार निवडणूक पारदर्शक होणार, निवडणुकीच्या 10 दिवस आधीपर्यंत नावे जोडता येतील, ओळखपत्रही मिळेल, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची मोठी घोषणा https://tinyurl.com/4f2drhd9
4. मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचाच मराठी आणि अस्सल भगव्या रक्ताचा होईल, दिल्लीचे जोडे उचलणारा होणार नाही, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना विश्वास https://tinyurl.com/7nm68vmu ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीआधीच पाच महापालिकांसाठी चाचपणी, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि पुण्यात युतीसाठी ठाकरेंची शिवसेना-मनसेमध्ये चर्चा https://www.youtube.com/watch?v=EsXsKzQQpAg
5. शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं, आमच्या हक्काचं ओबीसींना दिलं; मनोज जरांगेंची पहिल्यांदाच पवारांवर टीका https://tinyurl.com/4xkhybsv आपण उगाच जरांगेला डोक्यावर घेतो, तो मराठ्यांचा लीडर नाहीच, तो वाळू चोर, छगन भुजबळांनी जरांगेंना पुन्हा डिवचलं https://tinyurl.com/mvfxrw7f आम्ही लिहून ठेवू, जीव गेला तर जरांगेला फाशी द्या, ओबीसी आरक्षणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक https://tinyurl.com/2neefvrn
6. यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधा नाही, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांची माहिती, आर्थिक चणचणीमुळे योजना बंद होण्याची शक्यता https://www.youtube.com/watch?v=2vzcEcwW3Fw यंदा कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार, दोन उपमुख्यमंत्री असल्याने निर्माण झालेला पेच सुटल्याची मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांची माहिती https://www.youtube.com/watch?v=TK2SGrRp7os
7. कोल्ड्रीफ कफ सिरपच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये बालके दगावल्यानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय https://tinyurl.com/ekkke8h8 कोल्ड्रीफ कफ सिरप मेडिकलमध्ये दिसताच लगेच कॉल करा, राज्य सरकारकडून टोल फ्री नंबर जाहीर https://tinyurl.com/43x7eftb
8. ऊसाचा काटा मारणारे आणि रिकव्हरी चोरणारे सोबत घेऊन फिरत आहात, तुमच्या पक्षाच्या पोलादी पुरुष समजल्या जाणाऱ्या अमित शाहांमध्येही कारवाईची धमक नाही, माजी खासदार राजू शेट्टींचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती प्रहार https://tinyurl.com/m2rt5bx4 मुख्यमंत्री एवढा लबाड कसा बोलतोय, शेतकरी तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाहीत, बच्चू कडूंचा प्रहार https://tinyurl.com/2uedxzec
9. सुनावणी सुरू असतानाच सरन्यायाधीश भूषण गवईंसमोर बूट फेकण्याचा प्रयत्न, सनातन धर्माचा अपमान सहन करणार नसल्याची घोषणा देत कोर्टातच वकिलाचा गोंधळ https://tinyurl.com/y2xswyte अशा गोष्टींचा माझ्यावर परिणाम नाही, यामुळे विचलित होणार नाही, सरन्यायाधीशांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/59j29rd4
10. टीम कल्चरसाठी धोका, बीसीसीआयने रोहित शर्माचं कर्णधारपद का हिसकावलं? Inside माहिती समोर https://tinyurl.com/mm7exhh5 संघात निवडलं, पण बीसीसीआयने रोहित अन् विराटला दिला अल्टिमेटम, 2027 चा वनडे विश्वचषक खेळायचा असेल तर देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक https://tinyurl.com/mrxdbdmu
एबीपी माझा स्पेशल
महानगरं आणि तिथल्या घडल्या-बिघडल्या नात्यांची गोष्ट - खिडकी गाव (2025) https://tinyurl.com/3zrhejah
सयाजी शिंदेंचा मराठवाड्यासाठी मदतीचा हात, 'सखाराम बाइंडर' नाटकाचं मानधन पूरग्रस्तांना देणार https://tinyurl.com/ynadd3xn
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























