ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2025 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2025 | रविवार
1.ठाकरे बंधूंची जवळीकता आणखी वाढली, राज ठाकरे स्नेहभोजनासाठी कुटुंबासह 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंशी पावणे तीन तास चर्चा, गेल्या तीन महिन्यात सहाव्यांदा भेट https://tinyurl.com/4f68vw2y
2. अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना पक्षाकडून नोटीस, मुस्लिम समूदायाविषयी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी स्पष्टीकरण देण्याचे आदेश, दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करण्याचं केलं होतं वक्तव्य https://tinyurl.com/vnwbjjws अजितदादांनी नोटीस पाठवली तरी संग्राम जगताप ऐकेनात, आपले दोन-चार जण आत गेले तरी हरकत नाही, पण धर्माच्या रक्षणासाठी मुस्लिमांना उत्तर द्या, जगतापांचे आवाहन https://tinyurl.com/36ma7zkc
3. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कबुतरांचा विषय पेटण्याची शक्यता, जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक, 'कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान' असे पोस्टर्स व्हायरल https://tinyurl.com/25terf26
4. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचं काऊंटडाऊन सुरू, लंडनहून भारतात आणण्यासाठी मोठं पाऊल, इंटरपोलकडे मागितली मदत, ब्लू कॉर्नर नोटीस जारी https://tinyurl.com/4abbcvue बीडमधील अनेक गुन्ह्यातील आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला, चार महिला गंभीर, एका महिलेची प्रकृती चिंताजनक https://tinyurl.com/2fu8u7xu
5. पुण्यातील गुन्हेगारीवर केळेवाडीच्या गाडीवाल्याला विचारणार का? चंद्रकांत पाटील अनेक वर्ष आमदार, निलेश घायवळ आणि समीर पाटील हे त्यांच्या आजूबाजूलाच असतात, शिवसेना शिंदे गटाने नेते रविंद्र धंगेकरांचा चंद्रकांत पाटलांवर पुन्हा निशाणा https://tinyurl.com/3sbuhzru मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा हे धंगेकरांवर प्रेशर आणतायेत, रोहित पवारांचा आरोप https://tinyurl.com/2cfwczkx
6. या आधी भल्याभल्यांची सरकारं आम्ही पाडली, फक्त सहा टक्के मतं कमी केली की तुमचं सरकार गडगडणार, महादेव जानकरांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांना इशारा https://tinyurl.com/mrx7ksth
7. प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, त्याच चाकूने हत्या केली; पिंपरी चिंचवडमधील घटनेने खळबळ https://tinyurl.com/mryxc8r6 सहा वर्षांचे प्रेमसंबंधात अन् विश्वासघात, प्रेयसीच्या मोबाईलमध्ये परपुरुषासोबतचे अश्लील फोटो, संतापलेल्या बॉयफ्रेंडने हॉटेलमध्येच तिला संपवलं, पिंपरीतील हत्येमागची स्टोरी समोर https://tinyurl.com/3xmfpj2d
8. पोहण्याचा मोह नडला, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूरच्या खदानीत बुडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू, मुलांची दप्तर, चपला, कपडे जनावरं चारणाऱ्याने पाहिल्यानंतर घटना उघडकीस https://tinyurl.com/5edzemew आजीच्या डोळ्यादेखत आठ वर्षीय चिमुरडीचा ट्रकखाली चिरडून जीव गेला; नाशिकमध्ये भीषण अपघात https://tinyurl.com/yeryypah
9. ऑपरेशन ब्लू स्टार मोठी चूक, ज्यासाठी इंदिरा गांधींना आपल्या जीवाची मोठी किंमत चुकवावी लागली, माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचं वक्तव्य https://tinyurl.com/2xt92tkt
10. कुलदीप यादवच्या फिरकीमुळे वेस्ट इंडिजचा संघ नेस्तनाबूत, फॉलोऑनसुद्धा वाचवू शकले नाहीत, इंडिजचा पहिला डाव 248 धावात सपुष्टात https://tinyurl.com/bdzd5tx4 वर्ल्डकप सुरु असतानाच स्मृती मानधनाने इतिहास रचला, एका कॅलेंडर वर्षात एकदिवसीय सामन्यांमध्ये 1 हजार धावा पूर्ण करणारी जगातील पहिली फलंदाज https://tinyurl.com/2pfpepv3
एबीपी माझा विशेष
देवाला सोडलेलं लेकरू, काटा आणणाऱ्या कविता कसं लिहू लागलं? कवी इंद्रजीत भालेराव यांचा माझा कट्टा https://www.youtube.com/watch?v=IeDs3aQrJPo
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w


















