*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2025 | रविवार*
*1*. समुद्राला भरती आल्यानं लालबागच्या राजाच्या विसर्जनात अडचणी, 30 तासांनंतर मूर्ती तराफ्यावर चढवली, रात्री साडे दहानंतर विसर्जन होण्याची शक्यता https://tinyurl.com/5aje99hv वाडकर बंधू वर्षानुवर्षे हे काम करत होते, पण यंदा विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबागचा राजा मंडळावर आरोप https://tinyurl.com/4fwuwu2x
*2*. पुण्यातील विसर्जन मिरवणुका 32 तासांनंतर संपल्या, 1948 पासून ते 2025 पर्यंत कुठल्या वर्षी मिरवणुकीला किती वेळ लागला? https://tinyurl.com/2ttn64md पुण्यातील गणेश मंडळाचा उच्छाद, पोलिसांच्या नाकावर टिच्चून डीजे अन् फटाके फोडले https://tinyurl.com/7a7j4m6d
*3*. लाडक्या बाप्पाला निरोप देताना आक्रित घडलं, पुण्यातील चाकणमध्ये चार जणांचा बुडून मृत्यू https://tinyurl.com/42e4kv45 विसर्जन मिरवणुकीत वीजेच्या तारांना स्पर्श झाला, भाईंदरमध्ये तरुणाचा जागेवर मृत्यू, दुसरा तरुण थोडक्यात बचावला https://tinyurl.com/3f8auf4n
*4*. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का नाही, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन https://tinyurl.com/huy5hf8p देवेंद्र फडणवीस हे हिमालयासारखे नेते, राजकारणासाठी त्यांनी कोणत्याही समाजाचा वापर केला नाही, ओबीसींसोबत ते आता मराठ्यांचेही नेते, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची स्तुतीसुमने https://tinyurl.com/4zxhxuhf
*5*. सरकारनं काढलेला मराठा आरक्षणाचा जीआर चांगलाच, उगाच गैरसमज पसरवू नका, मनोज जरांगेंचं आवाहन, जीआरमध्ये दुरुस्ती करायची असल्यास करुन घेऊ, जरांगेंचे वक्तव्य https://www.youtube.com/watch?v=5GVIBFpVbLA&ab_channel=AxisMaxLifeInsurance मनोज जरांगेंना सरकारचा ड्राफ्ट आधीच माहिती होता, RSSच्या अजेंडाप्रमाणे मराठा समाजाला वेगळं पाडलं, मराठा समन्वयक डॉ. संजय लाखे पाटील यांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/2ushpsku
*6*. बीडमध्ये पोलिसांना आडनाव लावता येऊ नये ही लाजीरवाणी बाब, जिल्ह्यात समता उरली नसल्याची धनंजय मुंडे यांची खंत https://tinyurl.com/3u9emfn4 धनंजय मुंडेंवर बोलणं म्हणजे वर्ष वाया घालवणं, त्यांनी मजा करावी, राजकारण करावं, पण मराठ्यांच्या वाट्याला गेल्यास मात्र सुट्टी नाही, मनोज जरांगेचा हल्लाबोल https://tinyurl.com/2s4afv5m
*7*. सोलापुरातील करमाळा तालुक्यातील कुर्डूमध्ये मुरुम माफियांची बीडपेक्षा मोठी दहशत, माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटलांचा आरोप https://tinyurl.com/2h4aubuy कुर्डूमध्ये आयपीएस अंजली कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्यच, शासनातील कुणीही मुरुम माफियांच्या पाठीशी राहणार नाहीत, मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न https://tinyurl.com/54cxzkd5
*8*. पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात महिलेचं कनेक्शन समोर, आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह 11 जणांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/sewa5rhk आंदेकर विरुद्ध कोमकर या दोन कुटुंबात टोळी युद्ध कसं सुरु झालं? काय आहे रक्तरंजित इतिहास https://tinyurl.com/4s5b4pzn
*9*. लेकीच्या प्रेमसंबंधाची कुणकुण लागताच जन्मदात्या बापाचा राग अनावर, निर्घृणपणे हत्या करत फास घेतल्याचा बनाव रचला, जालना हादरलं https://tinyurl.com/4ckun4cn कर्ज घेतलं, काही रक्कम परत करूनही सावकारांकडून वसुलीसाठी तगादा, नाशिकमध्ये कामगाराने विष पिऊन आयुष्य संपवलं https://tinyurl.com/55hk2zsm
*10*. मतदार फसवणूक प्रकरणात महत्वपूर्ण माहिती देता देता का बंद केली, निवडणूक आयोग भाजपचं बॅक ऑफिस झालं आहे का? काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/86xpn393
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*