ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2025 | मंगळवार
1) सरकारनं त्रिभाषा धोरणाबाबतचा जीआर रद्द केल्यानंतर 5 जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा साजरा करणार, वाजत गाजत गुलाल उधळत येण्याचं उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेंचं निमंत्रण https://tinyurl.com/4uekdves ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याचं ठिकाण ठरलं, वरळी डोम इथं सकाळी 10 वाजता होणार मेळावा, जाणून घ्या संपूर्ण A टू Z माहिती https://tinyurl.com/2kftxawd
2) देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना फोडण्याचा जीआर काढला तरी मराठी माणूस एकत्रच, आम्हाला जीआरच्या गोष्टी सांगू नका; संजय राऊतांचा पलटवार https://tinyurl.com/5c8mjwjr कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय पवारांना उद्धव ठाकरेंचा फोन, मातोश्रीवर भेटायला येण्याचा आदेश, सुनील प्रभूंच्या मध्यस्तीने नाराजी दूर https://tinyurl.com/3jw2ekfm
3) बीड लैंगिक छळ प्रकरणातील शिक्षकांच्या पोलीस कोठडीत 5 जुलैपर्यंत वाढ, न्यायालयाचे आदेश https://tinyurl.com/yk8vtv7r बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणात दोन्ही शिक्षकांची तब्बल दहा तास चौकशी, दोघांच्याही मोबाईलचे सीडीआर काढण्याचे काम सुरु https://tinyurl.com/3ven67uf बीड लैंगिक छळ प्रकरण! मी त्यांच्यासारखा 150 दिवस पळून गेलो नाही, धनंजय मुंडेंच्या खळबळजनक आरोपावर संदीप क्षीरसागरांचा पलटवार https://tinyurl.com/4a9vdh8s
4) मोदी तुमचे बाप असतील, शेतकऱ्यांचे नाही, काँग्रेस आमदार नाना पटोले विधानसभेत आक्रमक, भाजपच्या बबनराव लोणीकरांवर हल्लाबोल, राजदंड उचलण्याचा प्रयत्न केल्याने निलंबन https://tinyurl.com/3m3shv59बाप तो बाप होता है! शेतकऱ्यांच्या अपमानावरुन आक्रमक झालेल्या नाना पटोलेंना एकनाथ शिंदेंचे उत्तर https://tinyurl.com/4zmtj344 हिंदीच्या मुद्द्यावरून भाजप अन् अजितदादांच्या राष्ट्रवादीनं अडचणीत आणलं; शिवसेनेचे नेते शिशिर शिंदेंनी व्यक्त केल्या भावना, खात्रीलायक सुत्रांची माहिती https://tinyurl.com/5c652z58
5) राणे फॅमिलीची चोच नेहमी नरकातच बुडालेली असते, भास्कर जाधवांचा नारायण राणेंवर हल्लाबोल; 'नेपाळी वॉचमन' म्हणत नितेश राणेंवरही टीका https://tinyurl.com/bdcnxkpv बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरच तुमचा मुलगा उभा राहिला, तुम्हाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईकांची टीका https://tinyurl.com/4bvrnwwh
6) नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एल्गार, कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखला https://tinyurl.com/358smkem आषाढी वारीच्या शासकीय पुजेआधी शेतकरी कर्जमाफीसह शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, राजू शेट्टींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, 4 जुलैला पांडुरंगाला घालणार साकडं https://tinyurl.com/mw8vsnn7
7) धुळ्यात काँग्रेसला खिंडार, राहुल गांधींचे निकटवर्तीय माजी आमदार कुणाल पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश https://tinyurl.com/ydtumas2 अजित पवार यांच्यानंतर शरद पवारांना देखील नाशिकमध्ये मोठा धक्का बसणार, गणेश गीते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार https://tinyurl.com/45dr475k
8) पूर्व विदर्भात पावसाचा धुमाकूळ! गडचिरोलीतील 6 प्रमुख जिल्हा मार्ग बंद; भंडाऱ्यातील राष्ट्रीय महामार्गावरील बायपासचा कडा गेला वाहून https://tinyurl.com/2x7ps8z2 हिमाचलमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार! महाराष्ट्रातील पर्यटकही अडकल्याची प्राथमिक माहिती https://tinyurl.com/3tz4czar
9) ऐन उमेदीच्या काळात शॉर्ट फिल्म बनवण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागूंनी 10 हजारांची मदत केली होती, अभिनेता आमिर खाननं सांगितला किस्सा https://tinyurl.com/ykja8wu5 झी मराठीच्या मालिकेत अभिनेत्री विद्या बालन झळकणार; शिक्षिकेची भूमिका साकारणार, म्हणाली, जीभेवर मराठी भाषेचा गोडवा जपायचाय https://tinyurl.com/5n75sx7z
10) जसप्रीत बुमराह इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार, भारताचे सहायक प्रशिक्षक रयान टेन डोशेट यांची माहिती, कर्णधार शुभमन गिलचं टेन्शन मिटणार https://tinyurl.com/5dy68tvk भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, धोकादायक गोलंदाज जोफ्रा आर्चरला संघात स्थान नाही, अशी असणार प्लेईंग 11 https://tinyurl.com/vb8wpnmt चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर टीम जबाबदार; CAT चा निर्णय, सर्व IPS अधिकाऱ्यांचे निलंबन मागे https://tinyurl.com/8238s6wp
एबीपी माझा Whatsapp Channel-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w