ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जुलै 2025 | मंगळवार
1) पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही ठरलेल्या मार्गानेच मीरा भाईंदरमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा निघाला, शेकडो आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात https://tinyurl.com/5f5h2n77 स्थानिक आमदार आणि गृहखात्याने मोर्चा दाबण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही, मध्यरात्रीपासून 11 तासांत नेमकं काय घडलं? पोलिसांनी सुटका केल्यानंतर अविनाश जाधवांनी सांगितला घटनाक्रम https://tinyurl.com/yxkhb4fk मनसेचे नेते जाणीवपूर्वक संघर्ष होईल असा रुट मागत होते, त्यामुळेच मोर्चाला परवानगी नाकारली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/ykebwzac
2) मी आधी मराठी मग मंत्री, मंत्री प्रताप सरनाईक मीरा-भाईंदरच्या मराठी मोर्चात सहभागी, मात्र आंदोलकांकडून 50 खोकेच्या घोषणा, सरनाईक माघारी https://tinyurl.com/5t269hu मला कुणीही अडवलं नाही, मला अडवणाऱ्याला भीक घालत नाही; मोर्चेकरांच्या घोषणाबाजीवर मंत्री प्रताप सरनाईकांचं उत्तर https://tinyurl.com/35vsftj4 मंत्री प्रताप सरनाईक यांच्याबाबत जे झालं ते योग्य नाही, ते मराठी माणूस म्हणून मोर्चात आले होते, मनसे नेते अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/yweechnz
3) मीरा-भाईंदरमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीला सर्वस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार, खासदार सुप्रिया सुळेंचा आरोप, म्हणाल्या, ही लोकशाही आहे दडपशाही नाही https://tinyurl.com/39ck7r25 मीरा-भाईंदरमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून टॅक्सी, रिक्षाचालकांना मारहाण, आजपर्यंत कुठलीही कठोर कारवाई नाही; अबू आझमींचा मनसेवर जोरदार हल्लाबोल https://tinyurl.com/ytd2kexd
4) भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू, सागर धसांवर अहमदनगरमध्ये सुपा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल https://tinyurl.com/35vywsrk पुण्यात चार वर्षाच्या चिमुकलीला कुलूपबंद ठेवून आई मुलीला शाळेत सोडायला गेली, बाळ चालत चालत खिडकीतून बाहेर आलं, पण अग्निशमन दलातील जवानाच्या समयसुचकतेमुळं वाचले प्राण https://tinyurl.com/48sbpkbm
5) संविधानात रक्तहीन क्रांतीची ताकद, सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रतिपादन, राज्याच्या विधिमंडळ सभागृहात गवईंचा सत्कार https://tinyurl.com/5a4h2wzs विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक, सभागृहाबाहेर जोरदार घोषणाबाजी https://tinyurl.com/2tavvarw मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या 20 टक्क्यांनी वाढल्या; पहिल्या सहामाहीत तब्बल 520 शेतकऱ्यांनी संपवल जीवन, बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या https://tinyurl.com/bd64erwu
6) भाजप कधीच निवडणुका शांततेने किंवा प्रगतीशील मार्गाने जिंकू शकत नाही, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले भाजप पुढच्या काही दिवसात महाराष्ट्र आणि आपल्या संस्कृतीविरोधात विष पेरणार https://tinyurl.com/5n6rb8fz कुर्ल्यातील 9000 झाडांचे ‘अर्बन फॉरेस्ट’ उद्ध्वस्त करुन त्या जागी स्विमिंग पूल बांधण्याचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंचा मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर गंभीर आरोप https://tinyurl.com/472z5crc
7) ड्रीम 11, रमी ॲपमध्ये पैसे बुडाले, लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यानेच केली चोरी, आधी SP कार्यालयात बॅटरी चोरल्या तर आता दुचाकी चोरताना सापडला https://tinyurl.com/3hafkstm बहिणीचा प्लॉट केला पत्नीच्या नावे, बीडच्या माजलगावमध्ये भावानेच केली सख्ख्या बहिणीची फसवणूक, पाच जणांवर गुन्हा दाखल https://tinyurl.com/murumw2s मामानं केलं कंसमामला लाजवणारं काम, रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने भाच्यालाच घातला लाखोंचा गंडा, नाशिकमधील घटना https://tinyurl.com/2d6c2xwk
8) केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्यांच्या विरोधात उद्या भारत बंदची मोठी घोषणा, 25 कोटी कामगार आंदोलनात उतरणार, देशातील प्रमुख सेवांवर परिणाम होण्याची शक्यता https://tinyurl.com/mr5tfb2h डोनाल्ड ट्रम्प यांनी 14 देशांवर टेरीफ दर लावल्यानंतर जागतिक बाजारात अस्थिरता, जळगावमध्ये सोन्याचा दर 99,800 रुपये प्रति तोळ्यावर, ग्राहकांचं बजेट बिघडलं https://tinyurl.com/pzhursbf
9) मी आध्यात्मिक, धार्मिक नाही', हनुमान चालीसामुळे मिळते शांती, बॉलिवूडची मुस्लिम अभिनेत्री नर्गिस फाखरीचं वक्तव्य, म्हणाली वर्षातून दोनदा करते 9 दिवसांचा उपवास https://tinyurl.com/yaa9c3au शाळा असो वा कॉलेज मराठी भाषा शिकवलीच पाहिजे पण मराठीच्या नावाखाली भारतातील हिंदू बांधवांना मारहाण करणं चुकीचं', हिंदुस्तानी भाऊची थेट राज ठाकरेंना विनंती https://tinyurl.com/m8wy92z2
10) IPL क्रिकेटपटू यश दयालवर महिलेनं केला लैंगिक शोषणाचा आरोप, कलम 69 अंतर्गत गुन्हा दाखल, यश दयालने नोंदवला जबाब https://tinyurl.com/4tnukkj5 झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने उभारला 626 धावांचा डोंगर, कर्णधार वियान मुल्डरची 367 धावांची धडाखेबाज खेळी https://tinyurl.com/2rwtbfcs
एबीपी माझा Whatsapp Channel-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w