ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 ऑगस्ट 2025 | मंगळवार 

1. महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नाविन्यता धोरण 2025 जाहीर, वाढवण बंदर ते समृद्धी महामार्ग जोडला जाणार, भूसंपादनाला मान्यता, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 7 महत्त्वाचे निर्णय  https://tinyurl.com/ynzb98n6  यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा मिळणार नाही, लाडकी बहीण योजनेचा फटका बसल्याची मंत्री छगन भुजबळांची कबुली https://tinyurl.com/m8ntwn8f  

2. दिवाळीनंतर ऑक्टोबर अखेरीस महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली माहिती https://tinyurl.com/4mjvkzrn   मनसेसोबत युतीचा निर्णय पक्ष घेईल, तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा; महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश https://tinyurl.com/2ea3enje 

3. मुंबईत 29 ऑगस्टला होणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी जे नेते येणार नाहीत, त्यांना आगामी नगरपालिका, पंचायत समिती, महानगरपालिका निवडणुकांमध्ये पाडा, मनोज जरांगे पाटलांचा मराठा नेत्यांना इशारा https://tinyurl.com/ynzb98n6  अंतरवाली सराटीत केलेली चूक पुन्हा करु नका, अन्यथा तुमच्यासह पंतप्रधान मोदींना किंमत मोजावी लागेल; मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा  https://tinyurl.com/mr28buk6 

4. दादरच्या कबुतरखान्यावरील ताडपत्री तातडीने हटवण्यात येणार, त्यांना बंद करणं योग्य नाही, गरज पडल्यास सुप्रीम कोर्टात जाऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले जाहीर  https://tinyurl.com/y4p3u6um  कबुतरखान्याच्या स्वच्छतेसाठी महापालिकेची एक समिती नेमण्यात येणार, राज्य सरकारच्या निर्णयानंतर जैन समाज आनंदी https://tinyurl.com/4pke3tcy  

5. कंट्रोल फिडिंग करायला कबुतरं म्हणजे एकनाथ शिंदेंचे आमदार नाहीत, कबुतरखाना बंद केल्यानंतर आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना टोला https://tinyurl.com/22nktxmb  कबुतरांना दाणे टाकू नका सांगताच लोखंडी रॉड घेऊन आला, मुंबईजवळील मीरा-भाईंदरमध्ये महिलेसह वृद्ध वडिलांना मारहाण  https://tinyurl.com/4fkzd7ut  6. ठाकरे बंधूंविरोधात गरळ ओकणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढणार,  आता थेट कोर्टात खेचणार, मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्याकडून याचिका दाखल  https://tinyurl.com/kxdwarht  नागपुरातील येस बँकेच्या अनागोंदी कारभाराविरोधात मनसेचं आंदोलन, बँकेत सिनेस्टाईल राडा; पोलिसांसमोरच बँक अधिकाऱ्याला कानाशिलात लगावल्या  https://tinyurl.com/6ftxjxan 

7. पुण्यातील कोथरुड पोलिसांकडून छळ, दाद मागूनही तक्रार घेईनात, तरुणी आता थेट हायकोर्टात जाणार, पुरावे गोळा करायला केली सुरुवात  https://tinyurl.com/jc3ychtw  आधी भाजप प्रवक्त्या, आता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश; आरती साठेंच्या नेमणुकीवर रोहित पवारांचा सवाल, तर आरती साठे यांनी 6 जानेवारी 2024 सालीच पक्षाचा राजीनामा दिला होता, भाजपकडून स्पष्टीकरण https://tinyurl.com/bd6hm239 

8. मुंबईत रस्ता क्रॉस करताना भरधाव बाईकनं उडवलं, तरुणानं जागेवर जीव सोडला, सांताक्रुझ पश्चिम परिसरात अपघाताचा थरार https://tinyurl.com/u5nydx43 पुण्यात धक्कादायक घटना, गाडीला कट मारून घासल्याच्या राग; मित्रांना, भावाला मारण्यासाठी बोलवलं, थेट पिस्तूल काढली आणि केला गोळीबार, घटनेनंतर सुप्रिया सुळेंची संतापजनक पोस्ट https://tinyurl.com/mr2y2sex 

9. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन, दिल्लीत उपचारांदरम्यान वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  https://tinyurl.com/4nhm37n4  उत्तराखंडमध्ये ढगफुटी, दुर्घटनेत 50 जण बेपत्ता, चार जणांचा मृत्यू, बचावकार्य युद्धपातळीवर https://tinyurl.com/btvpnnub 

10. इंग्लंडविरुद्धचा दौरा संपला, आता टीम इंडिया आशिया कपमध्ये पाकिस्तानसोबत भिडणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक https://tinyurl.com/24c7ws2d 

एबीपी माझा स्पेशल 

ओला-उबरच्या धर्तीवर सरकारी अ‍ॅप येणार, परिवहन खात्याचा मोठा निर्णय, ST महामंडळाचं ॲप 'छावा राईड' नावाने धावणार; मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती https://tinyurl.com/3r3h2fj6 

एबीपी माझा Whatsapp Channel-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w