*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4जानेवारी 2026 | रविवार*
*1*.शब्द ठाकरेंचा! पाच वर्षात मुंबईत 1 लाख परवडणारी घरं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द, घरकाम करणाऱ्या महिलांना महिन्याला दीड हजार देणार, ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणाhttps://tinyurl.com/2jfe7jdd लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, मुंबईकरांसाठी राज-उद्धव ठाकरेंकडून वचननामा जाहीर, राज ठाकरे 20 वर्षांनी शिवसेना भवनात https://tinyurl.com/4ku99zba
*2*. इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, मुंबईचा महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच, राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान https://tinyurl.com/bddhaewn सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही, बिनविरोध निवडणुकीसंबंधी पश्चिम बंगालचा दाखला देत राज ठाकरेंचा भाजपवर जोरदार प्रहार, भाजप सत्तेतून जाईल तेव्हा दाम दुपटीने वसुल होईल, राज ठाकरेंचा इशारा https://tinyurl.com/uezz6jck
*3*. बिनविरोध निवड झाली त्या महापालिकांमध्ये निवडणुका घ्या, दमदाटी करणाऱ्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना तात्काळ निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी https://tinyurl.com/2p9u8tpy भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय, जेष्ठ कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बलांचा प्रहार https://tinyurl.com/436fxuwb
*4*. मुंबई पालिकेत उद्धव ठाकरेंनी तीन लाख कोटींचा भ्रष्टाचार केला, त्यांनी एकतरी विकासकाम दाखवावं, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांचं आव्हान, उद्धव ठाकरेंनी प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केल्याचा साटम यांचा आरोप https://tinyurl.com/4tp95z6s ठाकरेंना मोठा धक्का! मुंबईच्या माजी महापौर शुभा राऊळांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणारhttps://tinyurl.com/ybmxhyc5
*5*. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील प्रभाग 41 चे उमेदवार फारुख इनामदार यांच्या त्रासाला कंटाळून सादिक कपूर यांची आत्महत्या, अंगावर नावं लिहून जीवन संपवलं https://tinyurl.com/2wye8phs पुण्यातील टिपू पठाण टोळीचा आका, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना विकत घेतलं; फारुख शेखच्या जाचामुळे आयुष्य संपवणाऱ्या सादिक यांनी शेवटच्या चिठ्ठीत काय-काय म्हटलं? https://tinyurl.com/25nbcj4n उद्योगपती, बिल्डर, जपानचा आंबा पिकवणारा शेतकरी, ज्याच्या टॉर्चरमुळे पुण्यातील 56 वर्षांच्या व्यक्तीने आयुष्य संपवलं तेराष्ट्रवादीचा फारुख शेख कोण? https://tinyurl.com/3stc64fz
*6*. एक दिवस प्रचार सोडा आणि सोलापुरात या, निवडणुका कोणत्या पातळीला नेऊन ठेवल्या आहेत हे तुम्हाला कळेल,अमित ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर संताप, मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन https://tinyurl.com/4uaayhw9 माझे पप्पा मला आणून द्या... अमित ठाकरेंसमोर सोलापुरातील मृत बाळासाहेब सरवदेंच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश https://tinyurl.com/ycy4mzf6
*7*. नाशिकमध्ये राज ठाकरेंच्या मनसेसोबत विश्वासघात झाला, महिला नेत्याने आधी उमेदवारी अर्ज मागे घेतला अन् आता थेट भाजपध्येच प्रवेश केला https://tinyurl.com/mrbms7k9 सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश, वसई विरारमध्ये कार्यकर्त्याच्या पक्षांतराचा अजब गोंधळ https://tinyurl.com/53vdfbcc
*8*. हातपाय चिकटपट्टीने बांधले, दोरीने गळा आवळून दोन वर्षाच्या लेकीला संपवलं, मग आईनंही गळ्याला लावली दोर, पुण्यातील घटनेनंतर खळबळ https://tinyurl.com/4sbh3jcb लातुरातील नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन, घातपाताचा संशय https://tinyurl.com/bdcvjp4y
*9*. बिग बॉस मराठी सीझन 3 चा उपविजेता जय दुधाणेला मुंबई विमानतळावर अटक, पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई, जय दुधाणेनं आरोप फेटाळले https://tinyurl.com/yyp35aax
*10*. मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून बाहेर काढल्यानंतर क्रिकेटमध्ये मोठे पडसाद, बांगलादेशचा भारतात खेळण्यास नकार, आता थेट टी-20 वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा https://tinyurl.com/yx9bp5f9 बांगलादेशचा संपूर्ण प्लॅन उध्वस्त, टी-20 वर्ल्डकपच्या तोंडावर BCCIने मॅच शिफ्टिंगची मागणी धुडकावून लावली https://tinyurl.com/y577a3nu
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658
