*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मार्च 2025 | सोमवार*
1) वाल्मिक कराड असलेल्या बीडच्या जेलमध्ये राडा, बबन गिते समर्थकांची कारागृहातच हाणामारी; कराडला मारहाण झाल्याचा आमदार सुरेश धस यांचा दावा https://tinyurl.com/2s47bz4v वाल्मिक कराड, सुर्दशन घुलेला मारहाण झाली नाही ; अन्य कैदी सुदीप सोनवणे, राजेश वाघमोडे यांच्यात बाचाबाची; कारागृह अधीक्षक अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण; महादेव गितेला हर्सूल जेलमध्ये हलवलं https://tinyurl.com/457nukcm बबन गितेचा 'द एन्ड' केल्याशिवाय चप्पल घालणार नाही, भाजप आमदार सुरेश धसांनी सांगितला वाल्मिकचा प्रण https://tinyurl.com/2aevz5xr
2. तुम तिलक हो हमारे माथे का! जेलमध्ये वाल्मिक कराडला कथित मारहाण करणाऱ्या महादेव गितेसाठी बबन गितेने FB पोस्ट केल्याची चर्चा https://tinyurl.com/3sde7sp7 सातशे गाड्यांच्या ताफ्यासोबत पवारांच्या राष्ट्रवादीत, 9 महिन्यांपासून फरार, जेलमध्ये समर्थकांकडून वाल्मिक कराडला मारहाण, कोण आहे बबन गिते? https://tinyurl.com/mr2y4mfh वाल्मिक कराडने राखेचा पैसा बॉलीवूड इंडस्ट्रीत गुंतवला? फिल्म प्रोड्युसर असोसिएशनचं कार्ड सापडलं, बीड पोलीसही चक्रावले https://tinyurl.com/2vvtp3vv वाल्मिक कराडला तुरुंगात स्पेशल जेवण, थेट परळीच्या हॉटलाईनचा ॲक्सेस, सुरेश धसांचा मोठा दावा https://tinyurl.com/2pdpkd69
3. मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी उभे केलेल्या महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला, जागेवरच पोस्टमॉर्टम आणि अत्यंविधी; हत्या झाल्याची चर्चा, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा दावा https://tinyurl.com/ycxmnde5 वाल्मिक कराडला बीड कारागृहात गित्ते गँगकडून चोप, मनोज जरांगेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आरोपी सोंग करणारे, लोकांना वेड्यात काढण्याचा प्रकार करतात https://tinyurl.com/2mvjdjna
4. औरंगजेबाचा कबरीचा विषय अनावश्यक; बोलघेवड्या भाजप नेत्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चपराक https://tinyurl.com/3sb34zpn औरंगजेबाच्या खाणाखुणा आमच्या शहरात नको, तो इतिहास आम्हाला पुसायचाय, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट https://tinyurl.com/5ca6dp55 संदीप, आ बैल मुझे मार, करु नकोस! भाजपच्या प्रवीण दरेकरांनी राज ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्याला सुनावलं! https://tinyurl.com/5c3t7m57
5. छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाला त्याचा हा दुसरा दिवस आहे, मी गुढी-बिढी काही उभारत नाही, गुढीपाडव्याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य https://tinyurl.com/yc2t7aza
6. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या साखर कारखान्यास 296 कोटींची मदत; निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा मोठा निर्णय https://tinyurl.com/bdhhhb7w हातातोंडाशी आलेला घास ज्यावेळेस जातो त्यावेळी माणसाच्या मनात भावना निर्माण होते की पुढच्या वेळेस मी सोडणार नाही;2029 ला मी कर्जत जामखेडमधून लढायला तयार; विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचं वक्तव्य https://tinyurl.com/5c3t7m57
7.पीएम मोदींच्या नोट बंदीच्या निर्णयाला आठ वर्ष उलटले, तरीही राज्यातील बँकांमध्ये तब्बल 102 कोटी रुपयांच्या जुन्या नोट अद्याप पडून https://tinyurl.com/pt78ykuk भाजपच्या नव्या अध्यक्षाची निवड पुढच्या आठवड्यात, जे. पी नड्डांनंतर या 4 नावांची चर्चा, संघाच्या सहमतीनं होणार निर्णय https://tinyurl.com/2x5u37m
8. खडी केंद्रातील मुकादमाचे अनैतिक संबंध, महिलेच्या नवरा अन् मुलाने डोक्यात कोयता घालून संपवलं, रक्ताने माखलेल्या कपड्यांवर रस्त्यावर धावत सुटले; लातूरमधील घटना https://tinyurl.com/3m5nhzy9 थेट सांगली जेलच्या स्वच्छतागृहातून चक्क गांजाचा धूर; तीन आरोपींनी चिलिम बनवून गांजा ओढला https://tinyurl.com/2r5yrhx4
9. 'पाच दिवसांपासून जेवलो नाही, पत्नीला माझा चेहरा दाखवू नका'; अकोल्यात बायकोच्या छळाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या https://tinyurl.com/3fbwsvd8 लव्ह मॅरेजवाली बायको, मित्राच्या मदतीने उपजिल्हाधिकारी पतीला संपवण्याचा डाव; संभाजीनगर प्रशासनात खळबळ https://tinyurl.com/2p8cann7
10. आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी; वानखेडे स्टेडियमवर रंगणार थरार https://tinyurl.com/bddsfz3a महेंद्रसिंग धोनी चेन्नईसाठी आता पनवती झालाय, पहिल्यांदा त्याला काढून टाका, दोन पराभवानंतर कोणी केली बोचरी टीका? युवराज सिंगच्या वडिलांची सुद्धा करून दिली आठवण! https://tinyurl.com/v63jtux4 कोल्हापूरच्या फुटबॉलला पुन्हा एकदा गालबोट; मैदानातच खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, पोलिसांकडून लाठीमार https://tinyurl.com/3jxafuxy
*एबीपी माझा स्पेशल*
म्हाडाचं ठरलं, वर्षभरात 19497 घरं बांधणार, मुंबईत 5199 घरांंचं बांधकाम करणार, 15951.23 कोटींच्या बजेटला मंजुरी https://tinyurl.com/yc3n7y9j
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
