ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 नोव्हेंबर 2025 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 नोव्हेंबर 2025 | सोमवार
*1*. विश्वविजेत्या महिला टीम इंडियावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव, ICC कडून 40 कोटीचं तर BCCI कडून 51 कोटींचं इनाम, हरमनप्रीतच्या संघाचा फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय https://tinyurl.com/3acb76vy भारताने वर्ल्डकप जिंकला..देशात सर्वत्र जल्लोष; RCB च्या Victory परेडच्या दुर्घटनेमुळे प्रशासन सतर्क, महिला ब्रिगेडच्या व्हिक्टरी परेडबाबत निर्णय नाही https://tinyurl.com/2rcxw9cn
*2*. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून सुषमा अंधारेंचं ठिय्या आंदोलन, जयकुमार गोरे कोण तीस मार खान? गोरेंनी आधी स्वतःचं चारित्र्य बघावं, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल, रुपाली चाकणकर आणि सातारा पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह https://tinyurl.com/37snenh5 महिला डॉक्टरचे चारित्र्यहनन करणाऱ्या रुपाली चाकणकर अजून पदावर कशा? अजित पवार अशा कोणत्या 'रुपात' अडकलेत? प्रकाश महाजनांचा सवाल https://tinyurl.com/5djaydvj नाईक निंबाळकरांच्या 27 पिढ्यांच्या ब्रँडची अब्रू घालवलीत, फलटण डॉक्टर तरुणीच्या मृत्यूप्रकरणावरुन रामराजे रणजितसिंह निंबाळकरांवर कडाडले https://tinyurl.com/2f6hf8rj
*3*. मतदारयादीवरुन धार्मिक राजकारणाला वेग, ठाकरेंना केवळ भोईर-पाटील हेच दुबार मतदार दिसले, अन्सारी, शेख दिसले नाही का? आशिष शेलारांचा सवाल https://tinyurl.com/365jk9km राज ठाकरेंनंतर भाजपकडून 'लाव रे तो' व्हिडीओ, आशिष शेलारांनी मतदारयादीबाबत मोठा बॉम्ब फोडला, व्होट जिहाद म्हणत ठाकरे बंधूंवर घणाघात https://tinyurl.com/bdzdfes7 फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना पप्पूची उपमा दिल्यानंतर भाजप आणि सेनेमध्ये वाकयुद्ध, शेलारांनी नकळत फडणवीसांना पप्पू ठरवलं, उद्धव ठाकरेंची टीका https://tinyurl.com/2jffmfyt
*4*. मराठी माझी आई आहे तर उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल मात्र मावशी जगली पाहिजे, शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंची मुक्ताफळे https://tinyurl.com/yxp6h7xw
*5*. अॅडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द, बार कौन्सिलचा मोठा निर्णय, राहुल नार्वेकरांची बदनामी आणि राज्यपालांचा अपमान केल्याचा ठपका https://tinyurl.com/yeh7c6mz माझं न्यायव्यवस्थेवर प्रेम, त्यात काही चुका आणि उणिवा असतील तर त्या सांगायच्या नाहीत? सनद रद्द होताच असीम सरोदेंचा सवाल https://tinyurl.com/5u7vrzuj
*6*. गतिमंद मुलांना कुकरच्या झाकणांसह लाथा बुक्क्यांनी मारहाण, छत्रपती संभाजीनगरमधील गतिमंद मुलांच्या शाळेतील संतापजनक प्रकार, माझाच्या बातमीनंतर प्रशासनाकडून दखल शिपाई अन् केअरटेकरचे निलंबन, शाळेची मान्यता रद्द करणार, मंत्री अतुल सावेंची माहिती https://tinyurl.com/ypv72a8s
*7*. कबुतर मरत आहेत, तितक्या लांब कबूतर कशी जाणार? जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही जीवदयासाठी लढू, जैन मुनी निलेशचंद्र विजय यांची भूमिका https://tinyurl.com/y2phe8hk अखेर जैन मुनींनी आमरण उपोषण घेतलं मागे, मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकरांची मध्यस्थी फळाला, सरकारला 15 दिवसांची मुदत https://tinyurl.com/mvy4mfdm
*8*. घरखर्च देत नसल्याच्या रागातून पोटच्या पोरांनीच आईबापाचा काटा काढला, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडले, रायगड हादरलं https://tinyurl.com/yj6d79x9
*9*. खडीने भरलेल्या भरधाव डंपरची बसला भीषण धडक, खडीखाली गाडल्याने तेलंगणामध्ये तब्बल 20 जणांचा जीव गेला, मृतांमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांवर काळाचा घाला https://tinyurl.com/4xfhzyme भरधाव ट्रकने 17 वाहने चिरडली, 19 जणांच्या चिंधड्या, जयपूरमध्ये ट्रक ड्रायव्हरचा रस्त्यावर रक्ताचा पाट, 300 मीटरपर्यंत वाहने ठोकली https://tinyurl.com/5c82n2nv
*10*. पाकिस्तान अणुचाचणी करत असल्याचा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा, अमेरिकेलाही अणवस्त्र चाचणी करावी लागणार असल्याचं वक्तव्य https://tinyurl.com/dt855wjs
*एबीपी माझा स्पेशल*
धारावीची राधा, मोहालीची अमनजोत, सांगलीची स्मृती! वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारताच्या 11 वाघिणींची कहाणी https://tinyurl.com/3ypjm4th
रडले, नाचले, मैदानात झेंडा रोवला... वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या सेलिब्रेशनाचे 10 फोटो; संपूर्ण भारत भावूक https://tinyurl.com/5y2earjk
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w


















