Continues below advertisement


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जुलै 2025 | मंगळवार


1.भारतीय सैन्य चांगल्या स्थितीत असतानाही पाकिस्तानशी युद्ध अचानक का थांबवलं? विरोधकांचा सरकारला प्रश्न, तर युद्धाचे अनेक परिणाम असतात, त्यामुळे त्यावर विचार करून निर्णय घ्यावा लागतो, अमित शाहांचे उत्तर, पाकव्याप्त काश्मीरला जवाहरलाल नेहरुच जबाबदार असल्याचा आरोप https://tinyurl.com/mwu4s2kk  पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या 3 दहशतवाद्यांना ठार केलं, लोकसभेत अमित शाह यांची माहिती https://tinyurl.com/t9kca4n2 


2. पहलगाममध्ये हल्ला कसा झाला, तो का झाला याचं उत्तर मिळालं नाही, इतिहासात पहिल्यांदाच युद्ध सुरू होण्यापूर्वीच थांबलं, प्रियंका गांधी यांची संसदेत मोदी सरकारवर टीका https://tinyurl.com/3xdme7hd 


3. राज्यातील 10 जिल्ह्यात 'उमेद मॉल' उभारणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय https://tinyurl.com/msnjb6ad लाडकी बहीण योजनेत 4800 कोटींचा घोटाळा, महिलांचे पैसे पुरुषांच्या खात्यात गेलेच कसे? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल https://tinyurl.com/4smdme3u 


4. जबाबदारीने बोला, मुख्यमंत्र्यांकडून महायुतीच्या मंत्र्यांना सक्त ताकीद,मंत्र्यांच्या वर्तणुकीवर प्रश्न उपस्थित, तर माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट, भरत गोगावले आणि योगेश कदमांना अप्रत्यक्ष इशारा https://tinyurl.com/2yrdbump  शिवसेनेच्या मंत्र्यांवर कारवाई झाली तरच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर कारवाई होणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवारांची भूमिका, सूत्रांची माहिती https://tinyurl.com/yxrspkmt 


5. कोकाटे, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, बोलताना भान ठेवायला हवं, अजित पवारांनी अँटी चेंबरमध्ये कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना सुनावलं https://tinyurl.com/yn5se942  अजितदादांच्या चेंबरमधून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची देहबोली सगळं सांगून गेली, नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/5x4wxdsp 


6. जळगावच्या आमदाराकडे माझ्या जावयाच्या लॅपटॉपमधील फोटो अन् माहिती कशी जाते? अंमली पदार्थांचा रिपोर्ट का समोर येत नाही? एकनाथ खडसेंचा पुणे पोलिसांना सवाल https://tinyurl.com/5h8r3ef9 पोलिसांनी कुणाचेही फोटो लीक केले नाहीत, एकनाथ खडसे यांच्या आरोपांवर पुणे पोलीस आयुक्तांचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/2ujems3a 


7. पतीच्या बचावासाठी रोहिणी खडसे वकिलीचा कोट घालून न्यायालयात हजर, प्रांजल खेवलकरांना अडकवण्यासाठी ईशा सिंहचा वापर, खेवलकरांचा वकील विजयसिंह ठोंबरेंचा युक्तिवाद https://tinyurl.com/42ucentx  आपल्या पत्रकार परिषदेत साध्या वेशातील पोलिसांची पाळत, एकनाथ खडसेंचा आरोप https://tinyurl.com/yeyw3f4h 


8. योगेश कदमांच्या डान्सबारवरच्या छापेमारीचे आणि अवैध वाळू उपसाचे पुरावे दिले, आता मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अनिल परबांची मागणी https://tinyurl.com/mrp3anac 


9. गाय चोरीच्या संशयावरून दलित तरुणाला जात विचारत अमानुष मारहाण, एकास अटक, बुलढाण्यात धक्कादायक प्रकार https://tinyurl.com/y2uj2dde  छातीत दुखतंय म्हणत मिटींगमधून बाहेर पडला, सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली, पुण्यातील 23 वर्षीय आयटी इंजिनिअरचं टोकाचं पाऊल https://tinyurl.com/zwjrravx 


10. अंबानींचं वनतारा जिंकलं, कोल्हापूरकर हरले, कोर्टाच्या आदेशानंतर नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीला गावकऱ्यांचा भावपूर्ण निरोप, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे रडले https://tinyurl.com/mhpkej39 


एबीपी माझा स्पेशल


'शेवटचा श्वास सापाला वाचवताना घ्यायचाय..', 20 हजार सापांना जीवदान देणाऱ्या अकोल्याच्या सर्पमित्राची प्रेरणादायी कहाणी एकदा वाचाच https://tinyurl.com/k46m4nrb 


एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w