Continues below advertisement


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 ऑगस्ट 2025 | रविवार


1.अंतरवाली सराटीमधून 27 ऑगस्टला मुंबईच्या दिशेनं मराठा समाजाचा भव्य मोर्चा निघणार, आता आरक्षणाचा गुलाल लावूनच माघारी यायचं, बीडच्या सभेत मनोज जरांगेंचा एल्गार https://tinyurl.com/5dmcf8bw  ही शेवटची फाईट, आता मैदान सोडायचं नाही, मनोज जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन https://tinyurl.com/ytje6zr8  देवेंद्र फडणवीस तुमचं करिअर उद्ध्वस्त झालंयच, आता नरेंद्र मोदींना डाग लागून देऊ नका, मनोज जरांगेंचा इशारा https://tinyurl.com/nwy73ds5 


2. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ म्हणजे मराठा मुलांचे सिबिल खराब करण्याची यंत्रणा, मराठा आंदोलक विरेंद्र पवारांची घणाघाती टीका https://tinyurl.com/42mfuarf  महाराष्ट्रातील मराठा यंदा अरबी समुद्रात गणपती विसर्जन करणार, सकल मराठा मोर्चाचा एल्गार, सोलापुरातून आतापर्यंत 25 हजार गाड्यांची नोंदणी https://tinyurl.com/4sz7nwbm 


3. राहुल गांधींपाठोपाठ ठाकरे बंधूंकडून मतचोरीचा पुनरुच्चार, 2016 पासून मतचोरीबाबत बोलत असल्याचं राज ठाकरेंचं स्पष्टीकरण, तर मतचोरीवर लक्ष ठेवण्याचं उद्धव यांचं कार्यकर्त्यांना आवाहन https://tinyurl.com/3eedtfeb  राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना फोन, बाप्पाच्या दर्शनासाठी शिवतीर्थावर येण्याचं आमंत्रण, उद्धव ठाकरे सहकुटुंब हजेरी लावणार https://tinyurl.com/3u2xm3hp 


4. एखादा नेता मला भेटला म्हणून राजकारण होत नसते, महापालिका निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार, राज ठाकरेंच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, मनसेसोबतच्या भाजपच्या युतीची चर्चा मावळली https://tinyurl.com/432pvnur 


5. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाडक्या बहिणी, मग योजना बंद करु का? 'माझा'च्या रोखठोक सवालानंतर अजित पवारांची चिडचिड https://tinyurl.com/muzhfjma राज्य सरकारने 25 लाख लाडक्या बहिणींची नावे वगळली, या योजनेत मोठा भ्रष्टाचार, खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप https://tinyurl.com/yahh9dsj 


6. गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या गणेशभक्तांचे हाल, सलग दुसऱ्या दिवशी मुंबई-गोवा हायवेवर वाहतूककोंडी https://youtu.be/JT60fCkAeGQ?si=KEnRlsL9ilGj6Mae  कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 5103 जादा एसटी बसची सोय https://youtu.be/0VSlwpodspc?si=WXadbnSTMd0f8_GE 


7. नापास करण्याची धमकी देत शाळेच्या विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे, मुंबईतील नराधम शिक्षकाचे कृत्य https://tinyurl.com/4vdm6s64  चार वर्षाच्या चिमुरडीला नदीत फेकत पित्याने स्वतःही घेतली नदीत उडी, कौटुंबिक वादातून कृत्य, मालेगाव हादरलं https://tinyurl.com/576wb2z4 


8. पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये सुमारे 500 फ्रेशर्स इंजिनीयर उमेदवारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक, आरोपीला बेड्या https://tinyurl.com/mr2swp9a  नागपूरच्या भिवापुरात कारचा भीषण अपघात, भरधाव कार थेट 40 फूट खोल नदीपात्रात कोसळली, एकाचा मृत्यू https://tinyurl.com/ybhkc4v3 


9. भारतात रक्ताचा एक थेंबही न सांडता सत्ता बदलत आहे, आपली लोकशाही मजबूत केली, दिल्लीतील अखिल भारतीय सभापती परिषदेचे उद्घाटनप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे वक्तव्य https://tinyurl.com/37unzmf7 


10. कसोटीवीर चेतेश्वर पुजाराकडून निवृत्ती जाहीर, स्थानिक स्पर्धांत चांगली कामगिरी होऊनही संघात स्थान नसल्याने अखेर क्रिकेटच्या सर्व प्रकारांना अलविदा https://tinyurl.com/2hexk58d  भारताच्या कसोटी संघाचा कणा, 2 वर्षांपासून संघाबाहेर; कशी राहिली चेतेश्वर पुजाराची कारकीर्द https://tinyurl.com/af853bsr 


एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w