ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जून 2025 | गुरुवार

1. वर्धापनदिनाला ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, काल मातोश्रीवरील बैठकीत उपस्थित असलेले ठाकरेंचे दोन नगरसेवक विजेंद्र शिंदे आणि अजित भंडारींचा शिंदेसेनेत प्रवेश  https://tinyurl.com/27bffjuk  ठाकरेंच्या 22 नगरसेवकांना फोडण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून आमिष, माजी खासदार विनायक राऊतांचा आरोप, एकनाथ शिंदेंवर बोलताना जीभ घसरली, नपुंसक राजकारणी असल्याची उपमा https://tinyurl.com/3bta9kjn 

2. उद्धव ठाकरे वर्धापनदिन सोहळ्यात मोठी घोषणा करण्याच्या तयारीत, राज ठाकरेंच्या मनसेशी युती करण्यावर भाष्य करण्याची शक्यता https://shorturl.at/Up1xn   शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेसोबत युतीच्या हालचाली, उदय सामंत विशेष प्रयत्न करत असल्याची सूत्रांची माहितीस शिंदे राज ठाकरेंना स्नेहभोजनाचं निमंत्रण पाठवणार असल्याची माहिती https://shorturl.at/waG9l 

3. मुंबईकरांसाठी पुढचे 24 तास महत्वाचे,  हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अलर्ट जारी, जाणून घ्या सविस्तर माहिती  https://shorturl.at/OZPMA  एकाच दिवसात 6 तासात 3 वेळा मुंबईतील पावसाचा अलर्ट बदलला, भारतीय हवामान विभागाचा सावळा गोंधळ समोर https://shorturl.at/sC83A 

4. पुण्यात धो धो पाऊस, भिडे पूल पाण्याखाली गेला, हिंगणे खुर्द, पर्वती भागात वस्त्यांमध्ये पाणी शिरलं https://tinyurl.com/mr275exd   पुण्यात पावसाचा जोर वाढला, खडकवासला धरणातून 2 हजार क्युसेक पाण्याचा प्रवाह, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा https://tinyurl.com/4pcyu5sj 

5. नाशकात मुसळधार पावसाने गोदावरीला पूर, नदीपात्राजवळ कार पाण्यात अडकली, बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न https://tinyurl.com/25e6ac99  रायगडला अतिमुसळधार पावसाचा इशारा, अंबा नदी धोकादायक पातळीवर, तर पाताळगंगा दुथडी भरुन, रोहा आणि सुधागड तालुक्याला मोठा फटका, शाळांनाही सुट्टी जाहीर  https://tinyurl.com/tzansxv2 

6. एकनाथ शिंदेंचे मंत्री भरत गोगावलेंनी पुन्हा अघोरी पूजा केल्याचा आरोप, राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्याकडून व्हिडीओ शेअर https://tinyurl.com/bddz44cp  मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करण्यासाठी शिंदे गटाकडून अघोरी विद्येचा वापर; संजय राऊतांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/bd5hja68 

7. महिला आणि पुरुष नग्न होऊन अमावस्येला स्मशानात, चितेच्या राखेखाली बाहुली, नारळ, कोल्हापुरात भानामतीचा भयंकर प्रकार समोर https://tinyurl.com/3pn9chh3  तीनच दिवसांवर लग्न असतानाच विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू, धाराशिव जिल्ह्यातील धक्कादायक घटना https://tinyurl.com/mrxtaet6 

8. माळेगाव कारखान्याच्या मतदारांच्या याद्या, रात्री 11 वाजता PDCC बँक उघडी; अजितदादांचे पीए, भरणेंचे सहकारी उपस्थित, बारामतीत आरोप प्रत्यारोपाने वातावरण तापलं  https://tinyurl.com/yb2wtwvw 

9. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज आळंदीतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार, माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली https://tinyurl.com/bdetd8x2   पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुण्यातील वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गाचे आदेश जारी https://tinyurl.com/4m6kb78b 

10. पहिल्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला धक्का, इंग्लंडमध्ये 259 धावा करणारा करुण नायर दुखापतग्रस्त, अशी असेल भारताची प्लेइंग 11 https://tinyurl.com/ykjpvu8u 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w