ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2025 | सोमवार
1. मुंबई-ठाण्यासह राज्यभरात पावसाचे धुमशान, मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत, पुढचे 48 तास महत्त्वाचे https://tinyurl.com/3yxwhfdn मुंबई ठाण्याला पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट, पाणी साचल्यानं मुंबईसह, नवी मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी, तर ठाण्यातील शाळांना उद्याही सुट्टी https://tinyurl.com/46j4csv8
2. मराठवाड्यात पावसाचं थैमान, आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू, अनेक गावांमध्ये नद्यांचं पाणी शिरलं, लातूर, नांदेडमधून शेकडो नागरिकांचं स्थलांतर, मुखेडमध्ये कमरेइतक्या पाण्यातून अंत्ययात्रा https://tinyurl.com/5n8v73ca मराठवाड्यात घरादाराची पडझड, गुरं ढोरं वाहून गेली, अनेकांचा मृत्यू, कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान? https://tinyurl.com/5cj7nnvx
3. मुंबईत संध्याकाळी समुद्राला भरती, नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, पावसाच्या थैमानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आवाहन, राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन समितीकडून आढावा https://tinyurl.com/sc4jexn6 मुंबईच्या चेंबूरमध्ये मुसळधार, इमारतींचा तळ मजला पाण्यात, चेंबूरमध्ये भिंत कोसळली, रस्ते, रेल्वे, हवाई वाहतुकीवर परिणाम https://tinyurl.com/m727xp9w
4. कोकणाला मुसळधार पावसानं झोडपलं, जगबुडी आणि नारंगी नद्या धोक्याच्या पातळीवर, नदीकाठची गावं पाण्याच्या विळख्यात https://tinyurl.com/mryjkpfz रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट, मच्छिमारांना समुद्रान न जाण्याचं आवाहन https://tinyurl.com/2hmc49zd
5. मुंबईतील बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेची 21 संचालकांना नोटीस, तर मतदारांच्या घरी पाचशेच्या नोटा असणारी पाकिटं पोहोचल्याचा मनसेचा आरोप https://tinyurl.com/yck87ame
6. आपण स्वदेशीचा नारा देतोय, पण आधी शेतकऱ्यांवरील बंधनं हटवा, मंत्री छगन भुजबळांचा महायुती सरकारलाच उपरोधिक सल्ला, कृषिमंत्री म्हणून शरद पवारांनी केलेल्या कामाचं भुजबळांकडून कौतुक https://tinyurl.com/46jtrnc2
7. वाल्मिक कराडच्या निर्दोषमुक्तीसाठी वकिलांचा पावणे दोन तास युक्तिवाद; तर उज्ज्वल निकमांचे सव्वा तासात सडेतोड उत्तर, पुरावेच मांडले, संतोष देशमुख प्रकरणात आजची सुनावणी पूर्ण, आता 30 ऑगस्टच्या सुनावणीची प्रतीक्षा https://tinyurl.com/bd8v5r3e
8. पोलिसांवर मारहाण अन् शिवीगाळ केल्याचा आरोप करणाऱ्या पुण्यातील तीन मुलींविरोधात सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल https://tinyurl.com/37ea6r8k पोलीस कस्टडीमध्ये असताना पोलिसांनीच सोन्याचे दागिने घेतल्याचा आरोप, नागपूरमधील घटनेचे न्यायालयाकडून चौकशीचे आदेश https://tinyurl.com/tezvt4a4
9. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली, इंडिया आघाडीकडून तामिळनाडूतून उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू https://tinyurl.com/3xkx5764 महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर,भाजपनं पुन्हा जुना पॅटर्न वापरला, एनडीएचं संख्याबळ किती? https://tinyurl.com/2d8uazdm
10. भारतीय संघ आशिया कपमध्ये 14 सप्टेंबरचा पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळणार नाही, माजी क्रिकेटपटू आणि भाजप नेता केदार जाधवचा दावा https://tinyurl.com/2rtsfvf4 सूर्यकुमार यादवसह 11 खेळाडूंची संघात जागा पक्की, राखीव 4 जागेसाठी 7 खेळाडू रेसमध्ये, BCCI लवकरच करणार संघाची घोषणा https://tinyurl.com/sjmukpny
एबीपी माझा स्पेशल
मुंबईत अचानक इतका पाऊस का पडतोय? हवामान तज्ज्ञांनी कारण उलगडून सांगितलं https://tinyurl.com/b2dfvmmp
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w