ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मे 2025 | बुधवार
1. मुंबई, पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार, अनेक भागात पिकांचं नुकसान, यंदा मान्सूनही वेळेआधीच दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज https://tinyurl.com/c76n28ab रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी आज ऑरेंज अलर्ट, तर मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी यलो अलर्ट https://tinyurl.com/2kdxxtft अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, पुढील 36 तासांत संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता, मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचं मच्छिमारांना आवाहन https://tinyurl.com/3de4h7ke
2. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणात खळबळजनक दावे, नवरा, सासू,नणंदेला तीन दिवस कोठडी, लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्युनरही दिली, पण तरीही सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या, वैष्णवीच्या वडिलांनी हादरवणारी कहाणी सांगितली https://tinyurl.com/dmtwaxv5 दोन कोटी न दिल्यानं छळ वाढला, वैष्णवी हगवणेंच्या पतीनं माहेरच्या खानदानाचा काटाच काढतो म्हणत दिलेली धमकी, FIRमध्येही उल्लेख https://tinyurl.com/3mex4d33 वैष्णवीला सासरच्यांकडून अमानुषपणे मारहाण, सासू अंगावरती थुंकली, सणावेळी चांदीच्या गौराई अन् छळाचं सत्य समोर, वैष्णवीच्या आई-वडिलांनी सांगितली हकीगत https://tinyurl.com/39ey4ahw
3. अजित पवारांनी लग्नात फॉर्च्युनर कार पाहून राजेंद्र हगवणेंना खोचकपणे विचारलं, ही गाडी तुम्ही मागितली की त्यांनी दिली? https://tinyurl.com/ymvfxw3v वैष्णवीच्या वडिलांनी अजित दादांच्याहस्ते दिलेली चावी, फॉर्च्युनर अन् ॲक्टिव्हा पोलिसांकडून जप्त https://tinyurl.com/ms82a5h5
4. मुख्याधापिकेने पतीला संपवलं, विद्यार्थ्याच्या मदतीने मृतदेह जंगलात जाळला, अंडरविअर अन् शर्टच्या बटनामुळे यवतामळमधील क्राईम मिस्ट्रीचा उलगडा https://tinyurl.com/55m87wu5 जंगलात पतीचा मृतदेह टाकला,नंतर पुन्हा शाळेतल्याच विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मृतदेह जाळला https://tinyurl.com/ms828p69
5. मला पाकिस्तानात लग्न करायचं आहे, गद्दार ज्योती मल्होत्राची पाकिस्तानी अधिकाऱ्यासोबतचं नवं चॅट समोर, ज्योतीची पाकिस्तानात अनेक बँक खाती असल्याचंही उघड https://tinyurl.com/np253dvb गद्दार ज्योती मल्होत्राकडून अखेर आयएसआय संबंधांची कबुली, अली हसनने एजंट शाकीर आणि राणा शाहबाजची भेट घालून दिली, शाकीरच्या नंबरवर देशविरोधी माहिती दिल्याची कबुली https://tinyurl.com/2wdk9veu
6. छत्तीसगडमधील अबूझमाडच्या जंगलात 26 नक्षलवाद्यांचा खात्मा, एक कोटीचं बक्षीस असलेला नक्षली संघटनेचा सेक्रेटरी राजू बसव ठार, पंतप्रधान मोदी, अमित शाहांकडून कारवाईचं कौतुक https://tinyurl.com/k5dap4eu
7. ठाण्यात आई आणि मुलाकडून तरुणावर चॉपरने हल्ला, शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यालयातच थरार, जुन्या वादातून झालेल्या हल्ल्यात काहीजण जखमी https://tinyurl.com/3y5b4mx5
8. सरन्यायाधीश हे कायस्वरूपी 'राज्य अतिथी', भूषण गवईंच्या नाराजीनंतर राज्य सरकारकडून परिपत्रक जारी https://tinyurl.com/4ah25xj6 सरन्यायाधीशांनी स्वतःची अन् त्यांच्या खुर्चीची इभ्रत, गरिमा राखली पाहिजे, प्रकाश आंबेडकरांचा चीफ जस्टीस भूषण गवईंना सल्ला https://tinyurl.com/4m7azrdv
9. 'साथी' पोर्टलवरील प्रमाणित बियाणे घ्या, मुख्यमंत्र्यांचे आवाहन, महाविस्तार अॅपवरुन शेतकऱ्यांना A To Z माहिती देणार https://tinyurl.com/4hc4fzzb
10. वानखेडेवर आज मुंबई इंडियन्स अन् दिल्ली कॅपिटल्स भिडणार, प्ले ऑफचं तिकीट मिळवण्यासाठी दोन्ही टीम सज्ज https://tinyurl.com/5ybkxyvt पावसामुळे सामना रद्द झाला तर कोण जाणार टॉप 4 मध्ये? समजून घ्या गणित https://tinyurl.com/3dhbe2ex
एबीपी माझा स्पेशल
निमित्त काहीही असो, एक कप चहा तर हवाच; आंतरराष्ट्रीय चहा दिन का साजरा करतात? https://tinyurl.com/bd2s4wsw
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
