ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 एप्रिल 2025 | सोमवार 

1. गॅस सिलेंडरचा दर 50 रुपयांनी वाढला, उज्ज्वला धारकांना 550 रुपये तर बिगर उज्ज्वला धारकांना 853 रुपयांना गॅस सिलिंडर, सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं https://tinyurl.com/28vk6p25  शेअर मार्केटमध्ये हाहाकार सुरु असतानाच सर्वसामान्य भारतीयांच्या खिशावर सर्जिकल स्ट्राईक; पेट्रोल आणि डिझेल उत्पादन शुल्कात 2 रुपयांची वाढ https://tinyurl.com/456n2wkt    शेअर बाजारासाठी 'ब्लॅक मंडे', Sensex 2,226 तर Nifty 742 अंकांनी घसरला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या 16 लाख कोटींचा चुराडा https://tinyurl.com/2v443ezw  

2. आमची चूक नाही म्हणणारं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी A टू Z सांगितलं! https://tinyurl.com/yc4pv58t  दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रूत घैसास यांचा राजीनामा, चौकशीचा अहवाल येताच मोठा निर्णय https://tinyurl.com/4rb6sf6w  पेशंट साडेपाच तास रुग्णालयात, रक्तस्राव सुरुच होता, तनिषा भिसेंचा धीर खचला; रुपाली चाकणकरांनी स्टार्ट टू एंड सगळंच सांगितलं https://tinyurl.com/4u866pbf 

3. देशातील एवढ्या मोठ्या घराण्याचं नाव ज्या मंगेशकर रुग्णालयाला देण्यात आलं तिथे एवढी मोठी घटना, अतिशय दुर्दैवी; खासदार सुप्रिया सुळे यांचा घणाघात https://tinyurl.com/2hbw546u  मंगेशकर रुग्णालयामुळे पुणे भाजपमधील कोल्ड वॉर चव्हाट्यावर; मेधा कुलकर्णींच्या पत्रामुळे पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे नाराज https://tinyurl.com/43rbz8jv 

4. बदलापूर अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे बनावट एन्काऊंटर प्रकरणी हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका, पोलिसांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश https://tinyurl.com/yrhrxjnc 

5. शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध, उपमुख्यमंत्री शिंदेंना कोल्हापूर दौऱ्यात कामराच्या विडंबनाची आठवण करून दिली; मनपा शिक्षक गिरीश फोंडे तडकाफडकी निलंबित! https://tinyurl.com/44r6x37a  शक्तीपीठातून 50 हजार कोटी हाणण्याचा तुमचा डाव, सत्ता जाताच हीच जनता पायाखाली तुडवायला मागे पाहणार नाही; गिरीश फोंडेंना निलंबित करताच स्वाभिमानीचे सर्वेसर्वा राजू शेट्टी आक्रमक https://tinyurl.com/mta2wv2z 

6. दीड लाख पगार घेणाऱ्या झेडपी शाळेतील शिक्षक दाम्पत्याचा पोरगा इंग्रजी मीडियममध्ये शिकतो, हे पेव कोणामुळे फुटलं? मंत्री जयकुमार गोरेंनी घेतली शिक्षकांची शाळा https://tinyurl.com/ye2xudn4 

7. मोठेपणासाठी रडू नका, आपापसात भांडू नका; देवेंद्र फडणवीसांच्या काकूने सुधीर मुनगंटीवारांना खडेबोल सुनावले https://tinyurl.com/2fywyz99  सोवळं अन् जानवं नसल्याने भाजपचे माजी खासदार रामदास तडसांना राम मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारला https://tinyurl.com/3sjv9ae8 

8. साताऱ्यातील सह्याद्री साखर कारखान्यावर बाळासाहेब पाटलांचा झेंडा, पी.डी. पाटील पॅनलचा 21-0 ने दणदणीत विजय, भाजप नेत्यांच्या दोन्ही पॅनलचा पराभव https://tinyurl.com/469s4x54  चार महिन्यांपूर्वी जिंकलेल्या भाजप आमदाराला बॅलेट पेपरवरच्या निवडणुकीत निम्मी मतंही मिळवता आली नाहीत; रोहिणी खडसेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/3b3pzcn4 

9. दारुड्या मुलाची मारझोड असह्य झाली, आईनं उचललं टोकाचं पाऊल, धारदार शस्त्राने पोराला संपवलं, नांदेडमधील घटना https://tinyurl.com/4jxay2j8  आंबे काढताना लोखंडी आकड्याचा स्पर्श हायव्होल्टेज तारेला झाला अन् क्षणात तरुणाचा कोळसा झाला, रत्नागिरी हादरली https://tinyurl.com/2vhct7nk डॉक्टरने तपासण्याच्या बहाण्याने 16 वर्षांच्या मुलीला गच्चीत नेलं अन् दुष्कृत्य केलं, संगमनेर हादरलं https://tinyurl.com/285f2bnv 

10. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर RCB देणार मुंबईला टक्कर, कोण पडणार कोणावर भारी? MI च्या प्लेईंग 11 मध्ये जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाची अपेक्षा  https://tinyurl.com/em2cba4d  गुजरात टायटन्सचा गोलंदाज इशांत शर्मावर बीसीसीआयची कडक कारवाई; 25 टक्के मॅच फी भरावी लागणार; कारवाईचं कारण अजूनही अस्पष्ट https://tinyurl.com/42bj25me 

एबीपी माझा स्पेशल

मंदी आलीय का, SIP वाढवावी का, मार्केट अजून किती कोसळणार, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं, CA रचना रानडे EXCLUSIVE https://tinyurl.com/muy2958m 

हापूस आंब्याची आवक वाढली, तब्बल 1 लाख पेट्या APMC मार्केटमध्ये दाखल, दरात घसरण https://tinyurl.com/35mep7k3 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w