2. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी विरोधकांचे पोलीस अधिकारी सचिन वाझेंवर गंभीर आरोप, हिरेन-वाझेंमध्ये अनेकवेळा संभाषण झाल्याचा दावा, एनआयए चौकशीची मागणी
3. चालकाच्या बाजूच्या सीटलाही एअर बॅग बंधनकारक, नव्या वाहनांसाठी 1 एप्रिलपासून अंमलबजावणी, तर जुन्या वाहनांसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत
4. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच पारा वाढला, विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांचं तापमान 40 अंशाच्या घरात, मुंबईच्या तापमानातही वाढ
5. मालमत्ता कर भरण्यासाठी मुंबईकरांना 8 मार्चपर्यंत अल्टिमेटम, मुदतीनंतर अतिरिक्त दंड आकारणार, कर वसुलीसाठी महापालिका कठोर पावलं उचलणार
6. महाराष्ट्रात पाच महिन्यानंतर एका दिवसात 10 हजार कोरोनाबाधित, राज्यात सध्या एकूण 88,838 अॅक्टिव्ह रुग्ण
7. नागपूर शहरासाठी 7 मार्चपर्यंत लावलेले कडक निर्बंध 14 मार्चपर्यंत कायम; राजकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांवर बंदी
8. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पूर्ण; आंदोलक केएमपी एक्स्प्रेस वे जाम करणार
9. सिंधुदुर्गच्या आंगणेवाडी यात्रेला सुरुवात, कोरोनामुळे केवळ आंगणे कुटुंबियांना परवानगी, इतर भाविकांना प्रवेशबंदी
10. गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरचा नक्षलींचा शस्त्र कारखाना उद्ध्वस्त, सी-60 पथकाची मोठी कारवाई, एक जवान शहीद