- लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात देशभरातील 51 जागांवर सरासरी 62.46 टक्के मतदानाची नोंद, उत्तरेकडील दिग्गजांची मतपरीक्षा पूर्ण
- हिंमत असेल तर राजीव गांधींच्या नावानं निवडणूक लढवून दाखवा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आव्हान, तर राहुल गांधींकडूनही पलटवार
- महिला अधिकाऱ्यानं लावलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपातून सरन्यायाधीशांची मुक्तता, न्यायमूर्तींच्या त्रिसदस्यीय समितीकडून रंजन गोगोईंना क्लीन चिट
- विदर्भात उष्णतेची लाट कायम, आज आणि उद्या विदर्भातील जिल्ह्यात पारा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज
- आंतरजातीय विवाह केल्यानं अहमदनगरमध्ये बापानं लेकीला जावयासह जिवंत जाळलं, मुलीचा मृत्यू, जावयाची प्रकृती गंभीर
- चालक आणि वाहकपदाच्या भरती प्रक्रियेत वशिलेबाजी चालू देणार नाही, एसटी महामंडळाची उमेदवारांना ग्वाही
- मुंबईत मुजोर रिक्षाचालकांना आरटीओचा चाप, भाडं नाकारल्यानं साडे पाच हजार रिक्षाचालकांवर कारवाई, 719 परवाने रद्द
- कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठवली, मुंबई महापालिका आणि शिवसेनेला मोठा दिलासा
- अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं खरेदीला पसंती तर पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात आंब्यांची आरास
- आयपीएलचा आज पहिला क्वालिफायर सामना, रोहित शर्माची मुंबई इंडियन्स आणि धोनीची चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने