देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1) किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा, खासदार छत्रपती संभाजीराजे उपस्थिती लावणार, घरच्या घरी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचं आवाहन


2) भारतीयांनी अनुभवला वर्षातील दुसऱ्या चंद्रग्रहणाचा योग; भारतासह आशिया, यूरोप, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका खंडात दिसला निसर्गाचा आविष्कार


3) 2436 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 80 हजारांच्या पार; काल 1475 रुग्ण कोरोनामुक्त


4) जगभरात कोरोनाबाधितांची संख्या 68 लाख 44 हजार, रुग्णांच्या आकडेवारीत भारत सहाव्या स्थानी, अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या एक लाखावर


5) देशातील लॉकडाऊन फेल; ट्विटरवर ग्राफ शेअर करत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची मोदी सरकारवर पुन्हा टीका


6) वेळकाढूपणा करायला एमपीएससी म्हणजे चौकशी आयोग नाही, एमपीएससी परीक्षांच्या प्रलंबित निकालावरुन काँग्रेस खासदार राजीव सातव यांची टीका


7) आर्थिक मदतीसाठी सलून, पार्लर व्यावसायिकांचं आंदोलनाचं हत्यार, आज माझं दुकान माझी मागणी आंदोलन, दुकानं सुरु करण्याच्या परवानगीसाठी आक्रमक


8) 1 जूनपर्यंत राज्यातील 11 लाख 87 हजार स्थलांतरित मजूर आपापल्या राज्यात परतले, राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात माहिती


9) कोरोना व्हायरसमुळे यंदा सौदी सरकारकडून हज यात्रा स्थगित, भारतीय यात्रेकरुंना पैसे परत देण्याची हज कमिटी ऑफ इंडियाची घोषणा


10) अमेरिकेकडून चीनवर पूर्णत: बंदी नाही, आठवड्याला फक्त दोन चिनी प्रवासी विमानांना अमेरिकेत उतरण्याची परवानगी