1. राज्यभरात गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाचा उत्साह, डोंबिवलीत 70 फूट लांबीची भव्य रांगोळी, तर ठाण्यातील मासुंदा तलावही दिव्यांनी उजळला, शोभायात्रांचंही आयोजन


 

  1. यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्राचा डंका, पहिल्या पन्नासमध्ये सहा मराठमोळे चेहरे, सृष्टी देशमुख देशात मुलींमधून पहिली, तर तृप्ती धोडमिसे सोळावी


 

  1. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज गुढीपाडवा मेळावा, शिवाजी पार्कमध्ये संध्याकाळी जाहीर सभा, मोदी आणि भाजपाविरोधात राज ठाकरेंची तोफ धडाडणार


 

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नांदेडमध्ये, संध्याकाळी जाहीर सभा, काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातील मोदींच्या भाषणाकडे लक्ष


 

  1. मोदींविरोधात देशभरातले विरोधी पक्ष एकवटले, दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडिअमवर विरोधकांची जाहीर सभा, शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता


 

  1. लालकृष्ण अडवाणींना मोदींनी स्टेजवरुन डावललं, चंद्रपुरात राहुल गांधींचा गंभीर आरोप, तर पुण्यात राहुल गांधींच्या मोदीप्रेमावर विद्यार्थ्यांचा जयघोष


 

  1. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागराचं बंडाचं निशाण, भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडेंना विजयी करण्याचे कार्यकर्त्यांना आदेश


 

  1. पार्थ नवीन आहे, चुकला तर लगेच फाशी देता का? पंढरपूरमधील सभेत अजित पवारांचा माध्यमांना सवाल, ख्रिस्ती धर्मगुरुंकडे जाऊन चूक केल्याची कबुली


 

  1. पीएम नरेंद्र मोदी सिनेमा 11 एप्रिलला रीलिज होणार, सिनेमाच्या पोस्टरवर नवी तारीख जाहीर, तर प्रदर्शनावर 8 एप्रिलला सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय


 

  1. कोलकाता नाईट रायडर्सचा बंगळुरुवर पाच विकेट्सनी विजय, आंद्रे रसेलची 48 धावांची तुफानी खेळी, बंगळुरुचा आयपीएलमधला सलग पाचवा पराभव