आज रात्री 9 वाजता, 9 मिनिटं लाईट्स ऑफ... कोरोनाच्या अंधकारात दिवे, मेणबत्ती, टॉर्चच्या उजेडात उजळणार आसमंत
फक्त लाईट्स बंद करा, विजेची अन्य उपकरणं सुरु ठेवा, केंद्रीय उर्जा मंत्रालयाचं आवाहन तर सॅनिटायझर लावून दिवे लावू नका, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा सल्ला
जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच, 12 लाखापेक्षा जास्त जणांना लागण, 65 हजार मृत्युमुखी
तबलीगी जमातमुळे देशात 22 हजार लोकं क्वॉरंटाईन, 30 टक्के केसेससाठी मरकज जबाबदार, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण
कोरोनाशी लढण्यासाठी सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण देणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजूर वर्गासाठी काय उपाययोजना केल्या? तपशील सादर करण्याचे हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश
केशरी कार्डधारकांनाही कमी किंमतीत धान्य मिळणार, सवलतीच्या दरात धान्य दिल्याने राज्य सरकारवर 300 कोटींचा बोजा
कोरोनामुळे पाळीव प्राण्यांचे बुरे दिन, रस्त्यावर अनेक विदेशी श्वान बेवारस स्थितीत आढळले
लातूरमध्ये आठ मुस्लीम यात्रेकरूंना कोरोनाची लागण, लातूरच्या कोरोनोबाधितांच्या संपर्कात आलेले उस्मानाबादचे 10 नागरिक होम क्वॉरंटाईन
कोरोनामुळे पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीकडून नागपुरात पोलीस पत्नीची निर्घृण हत्या, हत्येचं कारण अस्पष्ट