देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...




  1. हाथरस प्रकरणी पोलीस अधीक्षकांसह सात जणांचं निलंबन, पीडित कुटुंबीय, आरोपी आणि पोलिसांची नार्को टेस्ट होणार; हाथरसमध्ये माध्यमांना मज्जाव


 

  1. यूपी सरकार आणि भाजपची प्रतिमा खराब होतेय, माध्यमांना पीडितेच्या कुटुंबीयाना भेटू द्या, भाजप नेत्या उमा भारतींकडून एबीपी न्यूजच्या भूमिकेचं समर्थन; पोलिसांच्या भूमिकेवरही नाराजी


 

  1. आता काशी-मथुराची चर्चा होऊ लागली आहे, देशातील समाजिक ऐक्य कंस टिकणार?, बाबरी विध्वंस प्रकरणातील निकालानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून चिंता व्यक्त


 

  1. मला वाटतं ते रात्री कपडे घालूनच तयार असतात, मध्यावधी निवडणुकांवरील वक्तव्यावरुन शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला


 

  1. विनायक मेटेंच्या उपस्थितीमध्ये आज पुण्यात मराठा मंथंन परिषद, उदयनराजे, संभाजीराजे उपस्थित राहणार


 

  1. खासदार संभाजीराजे यांचा धनगर आरक्षणाला पाठिंबा, कोल्हापुरात राम शिंदे यांच्याकडून भेट; तर धनगर समाज गोलमेज परिषदेत तीन ठराव


 

  1. 2019 विधानसभा निवडणुकीत दिलेली वचनं पूर्ण केली नाहीत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेची फसवणूक; आम आदमी पक्षाकडून अमरावतीत तक्रार दाखल


 

  1. देशात कोरोना बळींची संख्या 1 लाखांच्या पार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 81 हजार 484 नवे रुग्ण; दररोज सरासरी हजार रुग्णांचा मृत्यू


 

  1. अमेरिकन फेडरल न्यायाधीशांकडून 1 बी व्हिसा वरील बंदी उठवली; डोनाल्ड ट्रम्प यांच्या बंदीच्या निर्णयाला आळा; भारतीयांना दिलासा


 

  1. सनरायझर्स हैदराबादकडून चेन्नई सुपर किंग्सचा 7 धावांनी पराभव, रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनीची झुंज अपयशी