2. कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना आज सैन्यदलाकडून मानवंदना, हेलिकॉप्टर्स आणि फायटर विमानातून पुष्पवृष्टी होणार
3. राज्यातल्या लॉकडाऊनमध्ये झोननिहाय शिथिलता, राज्य सरकारचा निर्णय, मुंबई, पुणे, मालेगावला कुठलाही दिलासा नाही4. मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा केंद्राचा कोणताही प्रयत्न नाही, IFSC सेंटर प्रकरणावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची प्रतिक्रिया
5. मिशन कोटानंतर आता मिशन यूपीएससी, दिल्लीतल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे यांच्याकडून पाठपुरावा सुरू
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 03 मे 2020 | रविवार | ABP Majha
6. मीरा भाईंदरमधील 55 जणांची कोरोनावर मात, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून टाळ्यांचा गजर तर पालघरमधील 12 जणांनी कोरोनाला हरवलं
7. गुजरातच्या सुरतमध्ये घरी जाणाऱ्या परप्रांतियांच्या रांगा, पोलिसांनी मजुरांच्या गाड्या अडवल्या, परप्रांतियांची गर्दी ड्रोन कॅमेऱ्यात कैद
8. लॉकडाऊन काळात कोरोना संदर्भात राज्यात 89 हजार गुन्हे दाखल तर 51 हजार वाहने जप्त
9. केंद्र सरकारच्या आरोग्य सेतू अॅपवर राहुल गांधी यांच्याकडून प्रश्नचिन्ह, लोकांवर पाळत ठेवण्याची सिस्टिम असल्याची टीका
10. जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 35 लाखांच्या जवळपास तर 11 लाखांहून अधिक बरे झाले