- केंद्र सरकारकडून अनलॉक 1.0 ची घोषणा, 8 जूनपासून अटी-शर्तींसह हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स, धार्मिक स्थळं सुरु होणार, लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा प्रयत्न
- शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेसबाबत राज्यांशी चर्चा करुन निर्णय होणार, गृहमंत्रालयाची गाईडलाईन, निर्णयासाठी जुलै महिना उजाडण्याची शक्यता
- कंटेन्मेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांनाही सर्वत्र बंदी, रात्री 9 ते 5 पर्यंत संचारबंदी कायम राहणार
- राज्यात 24 तासात कोरोनाच्या 2 हजार 940 रुग्णांची नोंद, महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 हजारांच्या पुढे, दिवसभरात 99 रुग्णांचा मृत्यू
- विद्यापीठ परीक्षांबाबत येत्या 2 दिवसात निर्णय, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत राज्यातल्या कुलुगुरुंची बैठक
- लोकल सुरु झाल्या तरी 62 टक्के मुंबईकर किमान 2-3 महिने लोकल प्रवास करणार नाहीत, एम इंडिकेटरचा सर्व्हे
- काँग्रेसचे नेते माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या स्वागत कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
- लॉकडाऊनदरम्यान बंद असलेलं पुण्यातील मार्केटयार्ड आजपासून सुरू
- खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्मा तर अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवनच्या नावाची शिफारस
- अमेरिकन कंपनी स्पेसएक्सच्या 'क्रू ड्रॅगन डेमो 2' आंतराळयानाचं यशस्वी प्रक्षेपण, नासाच्या 2 अंतराळवीरांचं इंटरनॅशनल स्पेस स्टेशनकडे उड्डाण
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 31 मे 2020 | रविवार | ABP Majha