1. मुंबईमध्ये एका दिवसांत कोरोनाचे 38 नवे रुग्ण, मुंबई महापालिकेची माहिती; वरळीतील सात जण क्वारन्टाईन तर गोरेगावातील बिंबिसारनगरही सील

  2. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 220वर, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, वसई-विरारमध्ये नव्या रुग्णांची भर; तर देशातील आकडा 1300पार

  3. आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातील कोरोनाच्या वॉर रुमची जबाबदारी आश्विनी भिडे यांच्याकडे; 'वॉर रुमच्या माध्यमातून आवश्यक ती नियोजनात्मक, प्रतिबंधात्मक आणि व्यवस्थापकीय कार्यवाही करण्यात येणार

  4. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदतीचा ओघ सुरू, गेल्या दोन दिवसांत 12 कोटी 50 लाख रुपये खात्यात जमा; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

  5. कोरोनाचा सामना करण्यासाठी 25 हजार कोटींचे पॅकेज मिळावे; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्र सरकारकडे मागणी

  6. विकसित देशांच्या तुलनेमध्ये भारतात कोरोनाचा समूह संसर्ग नाही, वेळेत लॉकडाऊन केल्यामुळे संसर्ग कमी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

  7. वीजेचे दर एक एप्रिलपासून पुढील पाच वर्षासाठी कमी होणार, घरगुती, शेती, औद्योगिक वर्गाला लाभ, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचा निर्णय

  8. एप्रिलफुलनिमित्त चुकीचे मेसेजेस पाठवले तर कारवाई, पोलिसांचं पत्रक, व्हॉट्सअॅपग्रृपवर खबरदारी घेण्याचं आवाहन

  9. जगभरात कोरोनाचा कहर सुरुच, इटलीत गेल्या 24 तासांत 800हून अधिक बळी; अमेरिका स्पेनमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली

  10. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे टोकियो ऑलिम्पिकच्या नव्या तारखा जाहीर; 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीत होणार स्पर्धा