Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 28 जून 2021 | सोमवार | ABP Majha
1. आजपासून दुकानं दुपारी चारपर्यंतच सुरु राहणार, अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी पाचनंतर संचारबंदी, डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंधांमध्ये वाढ
2. 12 ते 18 वर्षीय मुलांसाठी लवकरच लस उपलब्ध होण्याची शक्यता, झायडस कॅडिलाच्या लसीची चाचणी पूर्ण, मान्यता मिळाल्यास लसीकरण शक्य
3. ओबीसी असल्याने महसूल खात्यापासून वंचित राहिलो, लोणावळ्यातील शिबीरात मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची खदखद
4. पदोन्नतीमध्ये आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद नाही, जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण, कोरोनाच्या वाढल्या प्रादुर्भावामुळे परिसंवाद यात्रा रद्द
5. माझ्यावर छत्रपतींचे संस्कार, मी मॅनेज होईन का? मराठा आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना संभाजीराजेंचा परखड सवाल
6. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी क्यूआर कोड असलेला पास सुरु करण्याचा सरकारचा विचार, अनावश्यक गर्दी वाढल्याने हालचाली
7. जम्मू काश्मीरमधील अनंतपुरामधील दहशतवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी फैयाज अहमद शहीद; पत्नी आणि मुलीचाही मृत्यू, परिसरात शोधमोहीम सुरु
8. टोकियो ऑलिम्पिकसाठी साताऱ्याच्या सरडे गावातील प्रवीण जाधवची निवड, तिरंदाजीचं प्रशिक्षण देण्यासाठी मजूर माता-पित्याने उपसलेल्या कष्टाचं अखेर चीज
9. यंदा गणेशोत्सवादरम्यान मूर्तीच्या उंचीबाबत मर्यादा नको; मूर्तीकार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची सरकारकडे मागणी
10. नाशिकच्या इगतपुरीमधील हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, 22 जणांना बेड्या, परदेशी महिलेसह दक्षिण आणि बॉलिवूडमधली काहींचा समावेश