देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. सरकारला 250 तर खासगी औषध विक्रेत्यांना हजार रुपयात कोविशिल्ड लसीचा डोस, अदर पुनावाला यांची माहिती, जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत दहा कोटी डोस उपलब्ध होणार


2. दुसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरुन निर्बंध वाढवण्याची चिन्ह, राज्यातील प्रमुख मंत्र्यांकडून संकेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार


3. दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध, कोरोना चाचणीचं अहवाल गरजेचा, नियामवली जाहीर


4. उन्हाळ्यात मुंबईची तहान भागवण्यासाठी समुद्राच्या पाण्याचा वापर, मनोरमध्ये क्षारयुक्त पाणी गोडं करण्यासाठी 1600 कोटींचा प्रकल्प, मुख्यमंत्र्यांकडून आढावा


5. महाराष्ट्रात सत्तांतरासाठी जुळवाजुळव पूर्ण, दोन महिन्यात भाजपची सत्ता आणण्याचा रावसाहेब दावनेंचा दावा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण


6. शरद पवार अजित पवारांऐवजी सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील, वर्षभरापूर्वीच्या शपथविधीची आठवण काढताना चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य


7. मतदार यादीत रोहिंग्या मुस्लिमांचा समावेश असल्याच्या दाव्यावरुन ओवेसींचा अमित शाहांवर हल्लाबोल, गृहमंत्री झोपा काढतायत का, ओवेसींचा सवाल


8. कार्तिकी यात्रेसाठी विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, सेवा म्हणून पुण्यातील दोन भाविकांकडून मंदिराला विविध रंगी एलईडी दिव्यांची सजावट


9. परराज्यातून येणाऱ्या अंबाबाईच्या भाविकांसाठी खुशखबर, देवीच्या दर्शनासाठी देवस्थान समितीकडून ई पासची सोय, दर्शनाच्या वेळेतही वाढ


10. आसामचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरुण गोगोई यांचे निधन, गुवाहाटीमधील रुग्णालयात वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास