स्मार्ट बुलेटिन | 23 एप्रिल 2020 | गुरुवार | एबीपी माझा
जगभरात कोरोनाचे जवळपास 26 लाख 37 हजार रुग्ण, सव्वासात लाख रुग्ण बरे, तर 56 हजार गंभीर
देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजार पार, आतापर्यंत 652 लोकांचा मृत्यू, तर गेल्या 24 तासांत 1489 लोकांना लागण
मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याचा सन्मान, मात्र परराज्यातील कामगारांसाठी विशेष ट्रेन सोडणं सध्यातरी अशक्य, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं स्पष्टीकरण
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर कमी होतोय, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
राज्यात 64 पोलिसांना कोरोनाची लागण, मुंबईत सर्वाधिक 34 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह
शासकीय कर्मचाऱ्यांना दिलासा, एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात होणार
प्रसुतीनंतर महिलेची रक्तासाठी फरफट, एक दिवसाच्या बाळासह दाम्पत्याची सुमारे सात किलोमीटर पायपीट, पालघरमधील वेदनादायी घटना
पालघर प्रकरणाचा तपास CBI अथवा SIT मार्फत करावा; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा 27 एप्रिलला सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार, लॉकडाऊनच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता
बिल गेट्स यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक! कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी केलेल्या उपाययोजनांची प्रशंसा