1. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात निरोगी आरोग्याचा यज्ञ, नांदेडमध्ये योगगुरु रामदेवांसोबत मुख्यमंत्र्यांची योगासनं, तर रांचीमध्ये पंतप्रधानांचा योग


2. मंत्र्यांपासून सामान्यांपर्यंत पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह, हाडं गोठवणाऱ्या थंडीत भारतीय सैन्याचा योगा, आयटीबीपी जवानांचा दिगारु नदीत योगाभ्यास

3. एमएमआरडीएचं अधिकारक्षेत्र वाढवण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर, एमएमआरडीएच्या अंतर्गत ठाणे, रायगड आणि पालघरचा समावेश

4. सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी सक्तीसाठी कायदा करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती, तर संख्यानामाच्या वादानंतर समिती स्थापन्याचा निर्णय

5. अखेर मान्सून महाराष्ट्रात धडकला, वरुणराजा कोकणात दाखल, 25 जूनपर्यंत महाराष्ट्रभर व्यापणार



6. लोकसभेत आज तिहेरी तलाक विरोधी विधेयक सादर होणार, तीन तलाक आणि हलाला प्रथा हद्दपार करण्यासाठी राष्ट्रपती कोविंद यांचं अभिभाषणातून आवाहन

7. हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये भीषण अपघात, 500 फूट खोल दरीत बस कोसळल्याने 44 प्रवाशांचा मृत्यू

8. डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणानंतर अॅन्टी रॅगिंग कायदा कडक करण्यासाठी सरकारच्या हालचाली, समिती स्थापन करणार

9. ताजमहलपेक्षा पर्यटकांची मुंबईच्या धारावीला जास्त पसंती, ट्रिप अॅडवायझर वेबसाईटच्या सर्व्हेनुसार पर्यटनात धारावी पहिल्या नंबरवर

10. टीम इंडियाला दुखापतींमुळे तिसरा धक्का, नेट प्रॅक्टिस दरम्यान विजय शंकरच्या तळपायाला दुखापत, अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळण्याविषयी अनिश्चितता