स्मार्ट बुलेटिन | 20 मार्च 2021 | शनिवार | एबीपी माझा

राज्यात एका दिवसात सर्वाधिक कोविड रुग्णांची नोंद, 24 तासात 25 हजार 681 नवे कोरोनाबाधित मुंबईतही कोविड रुग्णसंख्येचा नवा उच्चांक; काल दिवसभरात रुग्णसंख्या 3 हजारांच्या पार मुंबईत रोज 1 लाख नागरिकांना लस देण्‍याचे उद्द‍िष्‍ट, खासगी रुग्‍णालयांना 1 हजार लसीकरणाचे टार्गेट अंबानींच्या घराबाहेर घटनेचं नाट्यरुपांतर; सचिन वाझे यांना कुर्ता घालून चालायला लावलं मराठवाड्यात अवकाळी पाऊस, राज्यातील काही भागात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी शेवटची संधी, वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना 26 मार्चपर्यंत प्रवेश घेता येणार कारशेडसाठीची जागा निश्चित करण्याचा अधिकार राज्य सरकारचाच, MMRDA ची हायकोर्टात भूमिका उद्या MPSCची परीक्षा, आयोगाकडून खबरदारीच्या सूचना, उमेदवारांना दोन्ही सत्रासाठी मास्क ,हॅन्ड ग्लोज, सॅनिटायझरचे किट आज जागतिक चिमणी दिवस, अकोल्यात भन्नाट पद्धतीनं जपलं जातंय चिमण्यांचं अस्तित्व व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम तब्बल 40 मिनिटं डाऊन; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस