देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

Continues below advertisement

1. आजपासून ओटीपी प्रणालीद्वारे गॅस सिलिंडरची डिलिव्हरी, सार्वजनिक बँका सकाळी 9 ते संध्याकाळी 4 पर्यंत सुरु राहणार,तर एसबीआयकडून बचत खात्याच्या व्याजदरात कपात

2. एकही काळा कपडा नको, कर्नाटक सरकारची बेळगावात दमदाटी, तर महाविकास आघाडीचे नेते काळ्या फिती लावून काम करणार, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि मुश्रीफांमध्ये वाग्युद्ध

Continues below advertisement

3. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मुंबईत मराठा जोडो अभियान, लालबाग ते ठाण्यापर्यंत संघर्ष मोर्चाचं आयोजन, मात्र अद्याप मोर्चाला परवानगी नाही

4. उदयनराजे भोसले- रामराजे नाईक निंबाळकरांच्या दिलखुलास गप्पा, कट्टर विरोधक एकत्र आल्यानं कार्यकर्तेही अवाक्, राजघराण्यातील वाद संपुष्टात आल्याची चर्चा

5.आजपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ, दोन्ही मार्गांवर लोकलच्या 2 हजार 20 लोकल फेऱ्या, चाकरमान्यांना दिलासा

6. 12 वर्षांपासून रखडलेला कळवा रेल्वे ब्रिज अखेर मार्चमध्ये सुरु होणार; मध्य रेल्वेची डोखेदुखी जाणार

7. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना पेन्ग्विन तर राज्य सरकारला औरंगजेब म्हणणाऱ्या समीत ठक्करला पुन्हा पोलीस कोठडी

8.बंजारा समाजाचे धर्मगुरु डॉ. रामराव महाराजांचं निधन, आज पोहरागड येथे अंत्यसंस्कार

9. जेम्स बॉन्ड' जिवंत करणारे ज्येष्ठ अभिनेते सर शॉन कॉनेरी यांचं निधन, वयाच्या 90 वर्षी घेतला अखेरचा श्वास

10. सरनरायजर्स हैदराबादची बंगळुरुवर 5 विकेट्सनी मात; प्ले-ऑफसाठी विराटसेनेची वाट खडतर, तर मुंबई इंडियन्सकडून दिल्ली कॅपिटलचा 9 विकेट्सनी धुव्वा