स्मार्ट बुलेटिन | 19 मार्च 2021 | शुक्रवार | एबीपी माझा
1. राज्यात काल एका दिवसातली सर्वाधिक रुग्णवाढ, तब्बल 25 हजार 833 नव्या रुग्णांची भर,तर धारावीतही कोरोना संसर्गाला वेग, प्रशासनासमोर मोठं आव्हान
2. कोरोना संसर्गामुळे लातूर, नांदेड प्रशासनाची खबरदारी, मुंबई-पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांची लातुरात तपासणी होणार
3. मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आज बाजू मांडणार, आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद पूर्ण
4. अंबानी स्फोटक प्रकरणी एनआयएकडून मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता
5. सलग 20 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर, कोणतीही दरवाढ नाही
6. कोविड लसीकरणात महाराष्ट्र अव्वल स्थानी, तरी राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण, काल दिवसभरात तब्बल 25,833 कोरोना रुग्णांची नोंद
7. ऊर्जामंत्र्यांच्या बंगल्यासाठी कोट्यवधी खर्च, भाजपचा आरोप, शेतकऱ्यांची वीज तोडता मग बंगल्यावर उधळपट्टी कशासाठी? विरोधकांचा सवाल
8. उपराजधानी नागपुरात महिलेचा गोंधळ, दुचाकीवर एकालाच परवानगी असताना दोघी जात असताना वाहतूक पोलिसांनी हटकल्यानं महिला संतप्त
9. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनवेळेत आजपासून बदल, सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी खुलं, कोरोना पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय
10. चौथ्या सामन्यात इंग्लंडचा 8 धावांनी पराभव, मालिकेत 2-2 अशी बरोबरी, आता निर्णायक सामाना 20 मार्चला