देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...  

  1. शिवजयंतीनिमित्त रायगडवर नेत्रदीपक रोषणाई, मंगळवेढ्यात तलवार आणि मशाल रॅली, माझावर आज दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल

  2. रायगडावरील प्रकाशयोजना विचित्र स्वरुपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी; रायगडावरील रोषणाईवरुन खा. संभाजीराजे यांनी पुरातत्व खात्याला फटकारलं

  3. राज्यात काल दिवसभरात 5,427 नवे रुग्ण; अमरावती, यवतमाळ, अकोल्यात काही भागात कंटेन्टमेन झोन जाहीर करण्याचे आदेश

  4. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा मेगा प्लॅन; लग्नकार्य, रेस्टॉरंट्स, नाईटक्लबवर धाडी पडणार, आयुक्तांचा निर्णय

  5. राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपेंना कोरोनाची लागण, ट्विट करत दिली माहिती, संपर्कात आलेल्यांना लक्षणं दिसल्यास चाचणी करण्याचं आवाहन

  6. संजय राठोंडावर आकसानं कारवाई करु नये, बंजारा समाजाच्या वतीनं राज्य सरकारला निवेदन देण्यात येणार, तर सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोपप्रत्यारोप

  7. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह 65 संचालकांना दिलासा

  8. एसआरएतील घरं विकण्याची मर्यादा 10 वर्षांवरुन 5 वर्ष करण्याचा विचार, राज्य सरकार २७ तारखेला कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करणार

  9. राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पावसाची हजेरी, कोल्हापूरच्या भुदरगडसह साताऱ्यातील खटाव तालुक्यात गारपीट, रब्बी पिकांना मोठा फटका

  10. नासाची ऐतिहासिक कामगिरी, पर्सेव्हरन्स मार्स रोव्हर मंगळावर यशस्वीपणे उतरले; मंगळ ग्रहावरील अनेक रहस्यांचा होणार उलगडा