1. शिवसेनेनं साद द्यावी, भाजपची दारं खुलीच, एबीपी माझाच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जात जनादेशाचा अनादर केल्याचाही आरोप

2. एकनाथ खडसेंचं तिकीट केंद्रातून कापलं गेलं, माझाच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट, तर गोपीनाथ गडावरील नाराजीनाट्यानंतरही पंकजा मुंडेंच्या पाठीशी

3. शरद पवार बोलतात ते सत्य, पण पूर्ण सत्य नाही, पवार-मोदी भेटीवर फडणवीसांचा दावा, तर अजित पवारांमुळेच गनिमी कावा फसल्याचीही खंत

4. मतदारसंघ सांभाळता न आलेल्या व्यक्तीमुळे फरक पडणार नाही, पंकजा मुंडेंच्या नाराजीवर खासदार संजय काकडेंचा टोला, भाजप आमदारांकडून काकडेंच्या वक्तव्याचा निषेध

5. नागरिकत्व सुधारणा कायद्याला महाराष्ट्रातूनही विरोध, काँग्रेस नेत्यांकडून अंमलबजावणीस नकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष्य



6. 21 दिवसात बलात्काराचा खटला निकाली निघणार, आंध्र प्रदेश सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातही अशा निर्णयाची गरज असल्याचं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं मत

7. पीएनबी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सीला दिलासा नाहीच, अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्यास सीबीआय कोर्टाचा नकार

8. मंत्रालयात महिलेची सहाव्या मजल्यावरुन उडी, पहिल्या मजल्यावर लावलेल्या जाळीमुळे प्राण वाचले

9. संभाजीनगर की औरंगाबाद नावावरुन महापालिकेत भाजप-शिवसेना नगरसेवक समोरासमोर, भाजप उपमहापौरांचा राजीनामा, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ

10. पुढील तीन दिवसात राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज