- देशभरात आज नीट 2020 प्रवेश परीक्षा, महाराष्ट्रात 2 लाख 28 हजार विद्यार्थ्यांसाठी 615 केंद्र सज्ज; कोरोनासंबंधीत नियमांचं पालन बंधनकारक
- केंद्रीयमंत्री अमित शाहांना श्वसनाचा त्रास, एम्समध्ये उपचार सुरु; तर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी उपचारासाठी अमेरिकेत
- दिल्ली दंगलीप्रकरणी आरोपपत्रात सीताराम येचुरी, योगेंद्र यादव यांच्यासह अनेक नेत्यांची नावे; कटात सहभागी झाल्याचा आरोप
- रियाने नाव घेतलेल्या के. जे ड्रग्ज फेडलरला अटक, डोंगरीतूनही एक जण ताब्यात; तर रियाकडून अभिनेत्री सारा अली खानसह रकुल प्रीत सिंह चं नाव, एनसीबीच्यासूत्रांची माहिती
- मुख्यमंत्री, कायदाव्यवस्था सांभाळता येत नसेल तर राजीनामा द्या, शिवसैनिकांच्या मारहाणीत जखमी झालेल्या निवृत्त नौसेना अधिकारी मदन शर्मा यांची मागणी
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो रावणाच्या रुपात, कंगनाकडून मीम शेअर, टीका करताना कंगनानं खालची पातळी गाठली
- ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर समित्यांची स्थापना; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
- ऑक्सफर्डकडून पुन्हा कोरोना लशीची चाचणी पुन्हा सुरु, तर सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्डबाबत अद्याप निर्णय नाही
- महाराष्ट्रातील बड्या नेत्यांना धमकी देणाऱ्याला कोलकात्यात बेड्या, एटीएसची कारवाई; सर्वांना धमक्या देणारा इसम एकच
- ठाण्यात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई, एका दिवसात 58 हजारांचा दंड वसूल
स्मार्ट बुलेटिन | 13 सप्टेंबर 2020 | रविवार | एबीपी माझा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Sep 2020 10:19 AM (IST)
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
NEXT
PREV
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -