स्मार्ट बुलेटिन | 10 फेब्रुवारी 2021 | बुधवार | एबीपी माझा
राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाखांचे बिनव्याजी पीककर्ज मिळणार, ठाकरे सरकारचा दिलासा
पाच महिन्यांच्या तीरा कामतसाठी आनंदाची बातमी, औषध आयात करण्यास केंद्राकडून कर माफ
मुंबईत ड्रग्ज तस्करीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर, एबीपी माझाचा एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट
विधानसभा अध्यक्षपदासाठी उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या नावाची चर्चा, राऊत दिल्लीत सोनिया गांधींच्या भेटीला
'21 मिनिटं' भंडाऱ्यातील बाळांचा आगीशी संघर्ष; फॉरेन्सिक टीमला मिळालेल्या CCTV फुटेजमधून स्पष्ट
माघी गणेश मूर्तींच्या विक्रीत 50 टक्क्यांची घट, गणेश मूर्तीकारांना कोरोनाचा फटका
हाफकिन इन्स्टिट्यूटनं विविध लसींच्या संशोधनावर भर द्यावा,मुख्यमंत्री ठाकरेंच्या सूचना
मराठी भाषेतून शिक्षण देणाऱ्या वैद्यकीय आणि तंत्रशिक्षण संस्था उभाराव्या, आशिष शेलारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
सरपंच कुणाचा? सकाळी शिवसेनेत, दुपारी राष्ट्रवादीत, संध्याकाळी भाजपात, मुरबाडमधील प्रकार
चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरसचा प्रसार झाल्याची शक्यता नाही, WHO चं स्पष्टीकरण