- जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्ष; भाषणादरम्यान आईची आवर्जून आठवण
- बिहारमध्ये सत्तांतराचे संकेत, एबीपी न्यूज सी वोटरचा र्सर्व्हे; नितीश कुमार आणि भाजपला मोठा धक्का बसण्याचा अंदाज
- योग्य ती सर्व खबरदारी घेऊन दिवाळीनंतर नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरु करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
- पाच तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर शनिवारी मराठा संघटनांचा मशाल मोर्चा स्थगित, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीचं आश्वासन
- महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबला तर खटारा; माझा कट्टा कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सरकारवर टीका
- विधानपरिषदेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे उमेदवार नाहीत म्हणून वंचितच्या उमेदवारांना पळवले, प्रकाश आंबेडकरांची टीका
- जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावजय गौरी गडाख यांच्या अचानक मृत्यूने खळबळ; राहत्या घरी आढळला मृतदेह, मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट.
- अर्णब गोस्वामी यांच्या अंतरीम दिलासा याचिकेवर उद्या हायकोर्टात फैसला, शनिवारी राखून ठेवलेला निकाल सोमवारी दुपारी 3 वाजता जाहीर करणार
- PUBG गेम भारतात पुन्हा सुरु होणार? लवकरच घोषणा होण्याची शक्यता; सूत्रांची माहिती
- फायनलचे तिकीट कोणाला? दिल्ली- हैदराबाद आज आमने-सामने, विजेता संघ अंतिम सामन्यात मुंबईशी भिडणार