देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. 15 ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्याचे केंद्र सरकारचे संकेत, केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांची माहिती, राज्य सरकारच्या निर्णयाकडे लक्ष


2. राज्यात गेल्या सहा दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये घट; मृत्यूदरही कमी, काल दिवसभरात 10 हजार 244 कोरोनाबाधितांची नोंद तर 12 हजार 982 जण कोरोनामुक्त


3. केंद्राच्या कृषी कायद्यांबाबत शेतकरी संघटनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज चर्चा, महाराष्ट्रात कायद्याची अंमलबजावणी करण्यास काँग्रेसचा विरोध


4. मुंबईत सर्व मराठा नेत्यांना एकाच मंचावर आणण्याचा नरेंद्र पाटील यांचा प्रयत्न, तर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी मराठा संघटना मातोश्रीबाहेर आंदोलन करण्याची शक्यता


5. कोकणातला प्रकल्प लातूरला नेण्यावरुन विनायक राऊत यांची अमित देशमुख यांच्यावर टीका, मेडिसीन रिसर्च प्रकल्पावरुन ठाकरे सरकारमधील असमन्वय पुन्हा समोर


6. ठाण्यातील अनंत करमुसे मारहाण प्रकरणी तीन पोलिसांना अटक, मंत्री जितेंद्र आव्हाड समर्थकांनी करमुसे यांना मारहाण केल्याचा आरोप


7. कोरोनावरील उपचारांनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले, माझी तब्येत उत्तम, व्हिडीओ जारी करुन ट्रम्प यांची माहिती


8. भारत आणि चीनमध्ये तणाव असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग समोरासमोर येण्याची शक्यता, 17 नोव्हेंबरला ब्रिक्सच्या व्हर्चुअल बैठकीत दोन्ही नेते भेटण्याची चिन्ह


9. दिल्लीच्या भेदक माऱ्यासमोर बंगलोरचे धुरंधर निष्प्रभ, दिल्ली कॅपिटल्सची रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरवर 51 धावांनी मात, आज मुंबई आणि राजस्थान आमनेसामने


10. चाहत्यांची प्रतीक्षा संपली, मिर्झापूर 2 या वेब सीरिजचा ट्रेलर आज प्रदर्शित होणार, दुपारी 1 वाजता ट्रेलर रिलीज करण्यासाठी अॅमेझॉन प्राईम सज्ज