देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीची सरशी, औरंगाबादमध्ये सतीश चव्हाण, पुण्यात अरुण लाड विजयी, तर नागपूरमध्ये भाजपच्या हातून सत्ता निसटण्याची चिन्ह
2. केंद्र आणि शेतकऱ्यांमधील चर्चेची चौथी फेरीही निष्फळ, उद्या पुन्हा बैठक, तर किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यात स्वाभिमानीचं जागर आंदोलन
3. कोरोनाच्या लढाईत भारतासाठी आनंदाची बातमी, वर्षअखेरीस लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळण्याची शक्यता, एम्सच्या संचालकांची माहिती
4. भारताकडून तब्बल 1 अब्ज 60 कोटी कोरोना लसीच्या डोसची ऑर्डर, अमेरिकेच्या नोवावॅक्सला पहिली पसंती, 50 वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य
5. सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजीत डिसले यांचा जगातील सर्वोत्तम शिक्षक पुरस्काराने गौरव, भारताला पहिल्यांदाच सात कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार
6. अहमदनरच्या रेखा जरे हत्याप्रकरणी सकाळच्या नगर आवृत्तीच्या संपादकांविरोधात पुरावे, पत्रकार बाळासाहेब बोठे यांच्याविरोधात पुरावे आढळल्याने खळबळ
7. ड्रेसकोड फलकाचा वाद चिघळण्याची शक्यता, तृप्ती देसाईंच्या फलक काढण्याच्या इशाऱ्यानंतर शिर्डी ग्रामस्थ आक्रमक, जशास तसं उत्तर देण्याचा निर्णय
8. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संपूर्ण मालमत्ता करमाफी देणाऱ्या बीएमसी प्रशासनाचा यंदा यू टर्न, 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांनाही मालमत्ता कराची बिले पाठवण्याची तयारी सुरु
9. कंगना रनौतचं ट्विटर अकाऊंट कायमचं बंद करा, मुंबईतील वकिलाची हायकोर्टात याचिका, वादग्रस्त ट्वीटद्वारे देशातील सामाजिक समतोल बिघडवण्याचं काम करत असल्याचा आरोप
10. आजपासून भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेला सुरुवात, एकदिवसीय मालिकेतल्या दारुण पराभवाचा वचपा काढण्याचं विराट सेनेसमोर आव्हान