देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

  1. वारकऱ्यांविना यंदा आषाढीचा सोहळा...! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न; कोरोनाचं संकट दूर होऊ दे, मुख्यमंत्र्यांचं विठ्ठल चरणी साकडं

  2. लालबागचाच्या राजाचा गणेशोत्सव उत्सव रद्द, कोरोनामुळे मंडळाचा ऐतिहासिक निर्णय निर्णय; 11 दिवस रक्त दान शिबिर आणि प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवणार

  3. ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत 2 ते 12 जुलैपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन, मोठ्या गोंधळनंतर लॉकडाऊनची घोषणा; आजपासून मिरा-भाईंदरमध्येही लॉकडाऊन

  4. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही आजपासून मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवासाला परवानगी; अत्यावश्यक सेवेशिवाय इतर कुणालाही परवानगी नाही

  5. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, काल दिवसभरात 4878 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 1951 रुग्ण कोरोनामुक्त

  6. कोरोनाच्या लढाईत डॉक्टरांच्या रुपात सगळ्यांना देव दिसतोय, 'डॉक्टर्स डे' निमित्त आरोग्यमंत्र्यांच पत्र

  7. मुंबईकरांनो पाणी जपून वापरा;  पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत पुढचे फक्त 30 दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक

  8. 59 अॅपवर बंदी घातल्यानंतर चीन सरकार बिथरलं; जागतिक व्यापर संघटनेच्या नियमांचं उल्लघंन केल्याच्या चीनच्या उलट्या बोंबा

  9. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना दिवाळीपर्यंत सुरु राहणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात जाहीर, लॉकडाऊनमधील गांभीर्य अनलॉकमध्ये हरवल्याची खंत

  10. रवींद्र जाडेजा भारताचा 'मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर', धोनी, कोहलीलाही टाकलं मागे; अष्टपैलू कामगिरीचा अभ्यास केल्यानंतर विस्डनकडून रवींद्र जाडेजाची निवड