1. निनावी फोननं मुंबई पोलिसांची झोप उडवली; सीएसएमटी, भायखळा, दादर स्थानकात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेमुळं खळबळ, फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु 


2. राज्यात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमांत मोठा बदल, जिरायत 2 एकर, बागायती 20 गुंठे खरेदी विक्रीवर निर्बंध, जमीन विभाजन, वाद यांतील गुंतागुंत कमी व्हावी म्हणून निर्णय 


3. राज्यात ग्रामीण भागांतील पाचवी ते आठवीच्या शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांची माहिती, तर शहरी भागांत आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचाही विचार 


4. हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना वेळ वाढवून देण्यासाठी निर्बंध शिथीलतेचा आढावा घेणार, मुख्यमंत्र्यांची माहिती, तर व्यावसायिक मंडळांच्या शिष्टमंडळाकडून उद्धव ठाकरेंची भेट 


5. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा द्या, विरोधक आग्रही, तर मुंबई लोकलसंदर्भात दोन दिवसांत निर्णय घेणार, मंत्री आदित्य ठाकरेंचे संकेत 


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 07 ऑगस्ट 2021 | शनिवार | ABP Majha



6. राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटलांचा दिल्ली दौरा, मनसे भाजप युतीच्या चर्चा, तर परप्रांतियांबाबत राज ठाकरेंच्या मनात कटुता नाही, चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य 


7. दिल्लीत देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहांमध्ये गुप्त भेट, फडणवीसांनंतर आशिष शेलार आणि शाहांची भेट, बॅकटू बॅक भेटींमुळं राजकीय वर्तुळात चर्चा 


8. लहान मुलांसाठी 2022 च्या पहिल्या तिमाहित लस उपलब्ध होणार, सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पुनावाला यांची माहिती, ऑक्टोबरमध्ये कोवोवॅक्स लॉन्च होण्याचीही शक्यता 


9. देशात कोरोना लसीकरणाचा रेकॉर्ड, 50 कोटींचा टप्पा ओलांडला, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाच्या लसींचे एक कोटींहून अधिक डोस   


10. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक कमावण्याची भारताला आज शेवटची संधी, गोल्फमध्ये अदिती अशोक, भालाफेकमध्ये निरज चोप्रासह बजरंग पुनियाकडून पदकाची आशा