Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 31 जुलै 2021 | शनिवार | ABP Majha


1. शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं पार्थिव सोलापूरच्या रुग्णालयातून पेनूरमध्ये दाखल, जन्मगावी होणार अंत्यसंस्कार, राजकारणातील एक पर्व हरपल्याची भावना

2. पूरग्रस्त भागात वीजबिल वसुली न करण्याचे महावितरणला आदेश, परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत वीजबिल आकारणार नाही, मंत्री नितीन राऊत यांची घोषणा


3. मास्टरशेफ संजीव कपूर यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात, 'वर्ल्ड सेंट्रल किचन'च्या सहयोगाने दररोज 15 हजार थाळ्या पुरविणार

4. फुकट बिर्याणीप्रकरणी पुण्याच्या महिला पोलीस अधिकारी प्रियंका नारनवरे अडचणीत येण्याची शक्यता, गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश, तर क्लिप मॉर्फ केल्याचा नारनवरेंचा दावा


5. मुंबईत अंथरुणाला खिळलेल्या रुग्ण्यांच घरी जाऊन लसीकरण सुरू, सोमवारपासून 24 वॉर्डात मोहीम, 4 हजार 500 रुग्णांची लसीकरणासाठी नोंद



6. शिल्पा शेट्टीचं नाव आणि फोटो वापरुन राज कुंद्रानं लोकांना लुटलं, भाजप आमदार राम कदम यांचा आरोप, तर शिल्पा शेट्टीला दिलासा देण्यास कोर्टाचा नकार


7. एकीचं बळ दाखवून जीएसटी भरायला नकार द्या, नरेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदींचं उल्हासनगरच्या व्यापाऱ्यांना आवाहन


8.  भारत चीन कोअर कमांडर्सची आज सकाळी साडेदहा वाजता मोल्डोमध्ये बैठक, गोगरा आणि हॉट स्प्रिंगसारख्या भागातून सैन्य माघारी घेण्याबाबत चर्चेची शक्यता


9. जगात पुन्हा एकदा वाढतोय कोरोनाचा धोका, अमेरिकेत डेल्टा व्हेरियंटच्या रुग्णांची वाढती संख्या, सहा महिन्यांआधीच तयारी केल्याचं जो बायडेन यांचं वक्तव्य

10. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या इराद्यानं बॅडमिंटन कोर्टवर उतरणार पी.व्ही.सिंधू, उपांत्य फेरीत सिंधूचा चीनच्या खेळाडूशी सामना