Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 2 फेब्रुवारी 2022 : बुधवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या इतर बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

1. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भातल्या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी, आता राज्य निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
2. कोरोना रुग्णसंख्या घटल्यानं राज्यापाठोपाठ मुंबईतले निर्बंध शिथिल, समुद्र किनारे-उद्यानं सुरु, हॉटेल-रेस्टॉरंटच्या वेळेची मर्यादाही हटवली
3. मुंबई, लगतची उपनगरं, पुणे, नाशिकच्या महापालिकांचा प्रारुप आराखडा जाहीर, मुंबईतल्या वॉर्ड रचनेवर भाजपचा तीव्र आक्षेप, हरकती नोंदवण्यासाठी आज बैठकीचं आयोजन
4. नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं फेटाळला; कोर्टाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, नितेश राणेंची उच्च न्यायालयात धाव
5. रेल्वेच्या जागेतली घरं तूर्तास हटणार नाहीत; रेल्वेच्या जागांवरील अतिक्रमणांबाबत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची मोठी घोषणा, 13 फेब्रुवारीच्या बैठकीनंतर निर्णयाची शक्यता
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 2 फेब्रुवारी 2022 : बुधवार
6. 300 कोटींचं बिटकॉईन हडपण्यासाठी पोलीस शिपायानं केलं अपहरण, अट्टल गुन्हेगारांच्या मदतीनं रचला डाव, पिंपरी पोलिसांकडून शिपाई दिलीप खंदारेसह 8 जणांना अटक
7. तळघरातल्या 650 लॉकरमध्ये काळी माया लपवणाऱ्या माजी आयपीएसचा भंडाफोड, नोएडात आर. एन. सिंह यांच्या घरी 3 दिवसांपासून आयकरची छापेमारी
8. केंद्रीय अर्थसंकल्पातून करदात्यांची पदरी निराशा, सलग सातव्या वर्षी आयकरात कोणताही बदल नाही, कररचना जैसे थे ठेवण्याचा निर्णय
9. मध्य रेल्वेवर 5 ते 7 फेब्रुवारीदरम्यान 72 तासांचा जम्बो मेगाब्लॉक; 350 लोकलसह कोकणात जाणाऱ्या एक्स्प्रेस तीन दिवस रद्द, ठाणे-दिवादरम्यानच्या मार्गिकेचं काम अंतिम टप्प्य़ात
10.अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत जेतेपदापासून दोन पाऊल दूर, दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारत-ऑस्ट्रेलियाची लढत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
