Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 28 एप्रिल 2021 बुधवार | ABP Majha

1. राज्यातील मोफत लसीकरणाबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार, प्रस्तावावर अजित पवारांची स्वाक्षरी, घोषणा मुख्यमंत्री करणार

2. विदर्भ, मराठवाड्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, मंत्री विजय वडेट्टीवारांचे संकेत तर आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेऊन निर्णय, जयंत पाटलांची माहिती

3. कोरोना संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उच्चस्तरिय बैठका; देशातील ऑक्सिजन स्थितीचा घेतला आढावा

4. 1 मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा देशात सुरू होणार, 18 वर्षांवरील सर्वांना आजपासून कोविन पोर्टलवर नोंदणी करता येणार

5. 18 ते 45 वयोगटातील सर्वांना केवळ खासगी रुग्णालयातच लस मिळणार, लसीसाठी पैसे मोजावे लागणार, मुंबई महापालिकेचा अजब निर्णय

6. मुंबईत मृतांचा आकडा लपवला जातोय, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात फडणवीसांचा आरोप, रेमडेसिवीरच्या काळाबाजारावरुन पंकजा मुंडेंचं अजित पवारांना पत्र

7. ठाण्यात मुंब्रा इथल्या प्राईम क्रिटीकेअर रुग्णालयात भीषण आग, चार रुग्ण दगावल्याची पोलिसांची माहिती, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश

8. परभणीत नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती टळली, ऑक्सिजन गळती वेळीच लक्षात आल्याने 14 रुग्णांचा जीव वाचला

9. भांडूप आग प्रकरणी सनराईज रुग्णालयाला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार, रुग्णालय पुन्हा सुरु करण्याची याचिका फेटाळली

10. फोन टॅपिंगप्रकरणी राज्य गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्लांची आज चौकशी होणार, शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचाही आरोप