दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो...
1. आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक, केंद्राकडून मिळणारी नुकसान भरपाई बंद होण्याची शक्यता असल्यानं करासंदर्भात मोठ्या निर्णयाकडे लक्ष
आज दुपारी साडेतीन वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. उद्या राज्य सरकार मागासवर्ग आयोगाला डेटा सादर करणार आहे. ओबीसी आरक्षण टिकावं असा डेटा सादर करण्याचं आव्हान राज्य सरकारसमोर आहे. यासोबतच राज्याचं महसुली उत्पन्न वाढवण्याबाबत या बैठकीत चर्चा होऊ शकते. केंद्राकडून येणाऱ्या जीएसटीसंदर्भातली नुकसानभरपाई यावर्षीपासून बंद होणार आहे, मात्र कोरोनाकाळात ही मुदत दोन वर्ष वाढवून देण्याची मागणी राज्य सरकार करणार आहे. त्याबाबतही आजच्याबैठकीत चर्चा होऊ शकते.
2. महाविकास आघाडीतल्या असमन्वयावर आज खलबतं, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोंडी होत असल्याचा काँग्रेसचा सूर
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतल्या असमन्वयावर आज खलबतं होणार आहेत. महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची आज बैठक होणार आहे. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोंडी होत असल्याचा सूर काँग्रेस नेत्यांमध्ये उमटत आहे.
उर्जा किंवा महिला-बाल कल्याण खात्याला मिळणारा निधी असो किंवा ओबीसी आरक्षणासंदर्भातील माहितीची देवाण-घेवाण. महाविकास आघाडीमधला असमन्वय वारंवार चव्हाट्यावर आला आहे. आणि त्यामुळं विरोधकांना टीका करण्यासाठी आयतं कोलीत मिळत आहे. मिनी विधानसभेच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेतला फेविकॉल कमकुवत झालेला परवडणार नाही. म्हणूनच महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची आज बैठक होणार आहे. महाविकास आघाडीत आपली कोंडी होत असल्याची काँग्रेसची तक्रार आहे. अनेक काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यातून त्यांची वारंवार प्रचिती आली आहे. त्यामुळं काँग्रेसची नाराजी दूर करण्यासाठी शिवेसना, राष्ट्रवादी काही पावलं उचलणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
3. मालाडच्या मैदानाचं टिपू सुलतान नामकरण अधिकृत नाही, मुंबई महापौरांची माहिती; तर मंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते उद्घाटनानंतर भाजप आक्रमक
4. मनसेसोबत भाजप युती करणार नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची माहिती, एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब
5. देशाचा यंदाचा अर्थसंकल्पही डिजिटल स्वरुपात, औपचारिकता म्हणून केवळ 100 प्रतींची होणार छपाई
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 27 जानेवारी 2022 : गुरुवार
6. एअर इंडियाचा कारभार 69 वर्षांनंतर आज टाटा समुहाकडे सोपवला जाण्याची शक्यता, कंपनीचा कायापालट करण्याचं आव्हान
7. मुंबईतल्या दहिसरमध्ये तब्बल सात कोटींच्या बनावट नोटा जप्त; मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई, सातजणांच्या टोळीला अटक
8. पालघरच्या चिंचणी बीचवर भरधाव कारनं 10 जणांना उडवलं, तिघांची प्रकृती गंभीर, कारचालकासह दोन जण ताब्यात
9. श्रीशांत पुन्हा IPL खेळणार? लिलावासाठीची मूळ किंमत फक्त 50 लाख रुपये
10. फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्माकडे कर्णधार पद, कुलदीप यादवलाही संधी