Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 25 ऑगस्ट 2021 बुधवार | ABP Majha


1. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना जामीन मंजूर, भविष्यात या प्रकारची घटना घडणार नाही अशी न्यायालयाला लेखी हमी, सुटकेनंतर राणेंचं सत्यमेव जयते असं ट्वीट


2. नारायण राणेंना जामीन मंजूर झाल्यानंतर समर्थकांचा जल्लोष, मुंबईसह राज्याच्या विविध भागात राणे समर्थकांकडून फटाके फोडत आनंदोत्सव


3. राज्यात पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना संघर्ष पेटण्याची चिन्हं, सामनामधून राणेंवर खरमरीत टीका तर करारा जवाब मिलेगा, नितेश राणेंचा इशारा


4. जामीनावर सुटका झाल्यानंतर केंद्रीय नारायण राणे मुंबईत, जनआशीर्वाद यात्रेला आज ब्रेक तर संचारबंदी असल्याने सिंधुदुर्गातील उद्याच्या यात्रेबाबत संभ्रम 


5.  गेल्या 70 वर्षात उभारलेली संपत्ती विकली जातेय,  राहुल गांधींची केंद्र सरकारवर खरमरीत टीका


 



6. उल्हासनगरात शिवसैनिकांनी भाजप नगरसेवकाला मारहाण करत तोंडाला काळं फासलं, शिवसेनेविरोधात बोलत असल्याने हल्ला


7. अनिल देशमुखांविरोधातील ईडीचं मनी लॉंड्रिंग प्रकरण, स्वीय सचिव संजीव पलांडे आणि कुंदन शिंदेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ


8. मोखाडामधील आत्महत्या वेठबिगारीमुळे नाही, पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचे स्पष्टीकरण


9. देशातील पहिली mRNA बेस्ड वॅक्सिन सुरक्षित, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी डीसीजीआय ची मंजुरी


10. भारत-इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना आजपासून लीड्समध्ये, जाडेजाऐवजी अश्विन तर पुजाराऐवजी सूर्यकुमारला संधी मिळण्याची शक्यता