1. मुंबईसह उपनगरात मुसळधार, सखल भागात पाणी साचलं, येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज, ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल वाहतूक धीम्या गतीने सुरु

2. भिवंडीत पुन्हा अग्नितांडव, दोन गोदामं जळून खाक, पेपर आणि प्लास्टिक साहित्याच्या गोदामाच्या आगीत लाखो रुपयांचं नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही

3. कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार अखेर कोसळलं, कुमारस्वामींचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार, राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

4. काश्मीरप्रश्नी डोनाल्ड ट्रम्प यांच्या खोट्या दाव्यानंतर विरोधक आक्रमक, पंतप्रधान मोदींकडे स्पष्टीकरण देण्याची मागणी, संसदेत कलगीतुरा

5. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू, तर 3 मेट्रो प्रकल्पांनाही मंजुरी, विधानसभेपूर्वी राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका



6. आयटी रिटर्न अर्थात कर परताव्यासाठी मुदतवाढ, 31 जुलैऐवजी 31 ऑगस्टपर्यंत रिटर्न फाईल करता येणार, नोकरदारांना मोठा दिलासा

7. महापालिकेने आदेशाची वाट न पाहता धोकादायक इमारतींवर कारवाईला सुरुवात करावी, हायकोर्टाचे निर्देश, इमारतींवरील कारवाईला दिलेली स्थगितीही उठवली

8. मुंबईत आता बेस्टचीही लेडीज स्पेशल बस धावणार, राज्य सरकारच्या निधीतून बेस्ट तेजस्विनी बस घेणार, 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर

9. आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडियाचं अव्वल स्थान कायम, फलंदाजांच्या क्रमवारीत कर्णधार विराट कोहलीही नंबर वन

10. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचा वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय, बांगलादेशविरुद्ध 26 जुलैला पहिला सामना खेळून मलिंगा निवृत्त होणार