Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 24 मार्च 2021 बुधवार | ABP Majha
1. गृहमंत्र्यांवरच्या आरोपांनंतर परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, सीबीआय चौकशीची मागणी मान्य होणार का? याकडे लक्ष
2. सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई क्राईम ब्रांचमध्ये मोठे फेरबदल, 65 पोलीस अधिकाऱ्यांची बदली, वाझेंचे सहकारी रियाज काझींची सशस्त्र पोलीस दलात रवानगी
3. राज्यांनी तयारी दाखवल्यास पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासंदर्भात चर्चा करु, लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचं स्पष्टीकरण
4. 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मागणी अखेर मान्य, 1 एप्रिलपासून सुरु होणार अंमलबजावणी
5. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, स्वत: ट्वीट करुन दिली माहिती
6. पहिल्या लॉकडाऊनला एक वर्ष उलटूनही निर्बंधांचा ससेमिरा कायम, होळीसाठी मुंबई महापालिकेची नियमावली, तर गुजरात प्रवेशासाठी आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक
7. गोकूळ दूधसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा धर्म सोडून नेत्यांची मोट, 2 मे रोजी मतदान तर 4 मे रोजी निकाल जाहीर होणार
8. विशेष सशस्त्र पोलीस विधेयकावरुन बिहार विधानसभेत जोरदार राडा, आमदारांनी अध्यक्षांना कोंडलं, तर गोंधळ घालणाऱ्या आमदारांवर पोलिसांकडून बळाचा वापर
9. "मला राजकारणात काहीही रस नाही, राजकारणाचा आणि माझा दूर दूर पर्यंत संबंध नाही", कंगना रनौतचं वक्तव्य
10. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत विजयी; इंग्लंडचा 66 धावांनी पराभव, मालिकेत 1-0 ने आघाडी