1. नाताळ आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर नाईट कर्फ्यूचं सावट, ओमायक्रॉनला रोखण्यासाठी निर्बंध लागू करण्याबाबत मुख्यमंत्री आणि कोविड टास्क फोर्समधल्या बैठकीत एकमत


2. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याबाबत विचार करावा, ओमायक्रॉनच्या संकटावर बोट ठेवत अलाहाबाद हायकोर्टाच्या सूचना, राजकीय सभातल्या गर्दीवरही चिंता व्यक्त


Postpone UP Election : ओमायक्रॉन बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, उत्तर प्रदेशात रॅलींवर बंदी घालायला हवी अशी सूचना केली आहे. याच बरोबर सरकारने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाही काही काळ पुढे ढकलण्यासंदर्भात विचार करावा, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. 


सध्या कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननं संपूर्ण जगाची धाकधुक वाढवली आहे.  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विचार करत, अलाहाबाद उच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्या एकल खंडपीठात जामीन अर्जांवर सुनावणी सुरु होती. यादरम्यान कोर्टातील गर्दी पाहून पंतप्रधान मोदींना, असं आवाहन करण्यात आलं आहे.


3. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यासाठी भाजप आग्रही, विधिमंडळ कामकाज समितीची बैठक वादळी ठरण्याची शक्यता


4. भांडुप बालक मृत्यू प्रकरणी अंसवेदनशील वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेच्या राजूल पटेलांचा माफीनामा, जंतूसंसर्गामुळं 4 बालकं दगावल्यानं विधिमंडळात विरोधकांचा हल्लाबोल


5. मध्य रेल्वेवर पाचवी -सहावी मार्गिका सुरु झाल्यानं लोकलच्या 80 फेऱ्या वाढणार, जानेवारी आणि फेब्रुवारीत दोन जम्बो ब्लॉक घेतले जाण्याची शक्यता


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 24 डिसेंबर 2021 : शुक्रवार : ABP Majha



6. शिवसेना गटप्रमुख रमेश जाधव हत्या प्रकरणी 4 आरोपींना जन्मठेप, 2014 मध्ये दोन गटातील वाद सोडवताना झाली होती हत्या


7.  केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आज धुळे दौऱ्यावर; विविध कामांचं उद्घाटन करणार 


8. विना मास्क फिरला तर मिळणार ई-चलान; औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय, आतापर्यंत 300 हून अधिक लोकांवर कारवाई


9. नाशिकमधून आपचे प्रवक्ते जितेंद्र भावे यांना अटक; शिक्षणाधिकाऱ्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप


Nashik News : आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते जितेंद्र भावे (Jitendra Bhave) यांना अटक करण्यात आली आहे. महिला शिक्षण अधिकाऱ्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी जितेंद्र भावे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं. 


आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते जितेंद्र भावे यांनी एका फेसबुक लाईव्ह दरम्यान, मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्यासह शिक्षण विभागावर ताशेरे ओढले होते. तसेच लाईव्ह दरम्यान सुनीता धनगर यांच्यां संदर्भात एकेरी उल्लेख करत त्या भ्रष्टाचारी असल्याचाही उल्लेख केला होता. मनपा शिक्षणाधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना खडे बोलही सुनावले होते. त्यावेळी बोलताना 'काम जमत नसले, तर घरी बसून धुणी भांडी करावीत', असं आक्षेपार्ह वक्तव्य जितेंद्र भावे यांनी केलं होतं. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. 


10. लसीचा बुस्टर डोस घेतला असला तरी गर्दी टाळाच, व्हाईट हाऊसचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी फाऊचींचा सल्ला