1. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसारख्या मोठ्या शहरांत लॉकडाऊन लागू शकतो, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे संकेत, आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक


  2. कोविशिल्डच्या दोन डोस दरम्यान ४ ते ८ आठवड्यांचं अंतर ठेवण्याच्या केंद्राच्या सूचना, अंतर वाढवल्यास जास्त फायदा होत असल्याचा निष्कर्ष


  3. सीआययूच्या कार्यालयातून एनआयएनं जप्त केली वाझेंची डायरी, व्यवहाराच्या नोंदींसाठी कोडवर्डचा वापर केल्याचा संशय


  4. पवारांकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुखांची सह्याद्री अतिथीगृहात तीन तास खलबतं, कुणाशी चर्चा केली याचा सस्पेन्स कायम


  5. शिवसेना खासदार अरविंद सावंतांनी कारागृहात टाकण्याची धमकी दिल्याचा नवनीत राणांचा आरोप, लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार, सावतांकडून आरोपांचं खंडन


  6. संसदेत जॅमर असताना फक्त जिओ कंपनीलाच नेटवर्क कसं मिळतं? शिवसेना खासदार श्रीरंग बारणेंचा सवाल


  7. 'सरळ रस्त्यानं चालणाऱ्याला डिवचायचं नाही', मुंबई पोलिसांच्या खात्यांबाबत केलेल्या प्रश्नाला अमृता फडणवीसांचं भाई जगतापांना प्रत्युत्तर


  8. अकोल्याच्या 'बकरी बँके'ची जगभरात चर्चा, 'गोट बँक ऑफ कारखेडा'च्या माध्यमातून ग्रामीण भाग 'क्रांतीकारी' बदलांच्या वाटेवर


  9. वाशिम जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी, राज्यभरात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान


  10. कसोटी आणि टी-२० मालिका जिंकल्यानंतर आजपासून एकदिवस सामन्यांना सुरुवात, सूर्यकुमारला संधी मिळण्याची शक्यता, धवनच्या कामगिरीवरही नजरा